आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनर किलिंग? पब्लिक पार्कमध्ये विवस्त्र आढळले युवक- युवतीचा मृतदेह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: पेटीत बंद युवतीचा मृतदेह)

सोनीपत- हरियाणातील सोनीपत शहरात एका पब्लिक पार्कमध्ये युवक-युवतीचा विवस्त्रावस्थेत मृतदेह आढळून आले. दोन्ही मृतदेह 24 ते 25 वयोगटातील असून ते दोन वेगवेगळ्या पेटीत ठेवण्यात आले होते. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहे. प्रथमदर्शनी हे प्रकरण ऑनर किलिंग असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

युवतीच्या हातात हिरव्या बांगड्या आहेत. त्यामुळे या युवक-युवतीचा काही दिवसांपूर्वी विवाह झाला असून दोन्ही पती-पत्नी असावेत, असेही मुरथल पोलिस ठाण्‍याचे प्रभारी प्रवीण कुमार यांनी सांगितले.
मिळालेली माहिती अशी की, मुरथल नॅशनल हायवे क्रमांक.1 वर देवीलाल पार्क आहे. पार्कमध्ये फिरणार्‍या काही लोकांना बेवारस अवस्थेत दोन पेट्या दिसल्या. एका व्यक्तीने एक पेटी उघडून पाहिली असता त्यात महिलेचा विवस्त्र मृतदेह आढळला. त्याप्रमाणे दुसरी पेटी उघडून पाहिली असता त्यात एका युवकाचा मृतदेह आढळला. त्याच्या अंगावरही एकही कापड नव्हते. युवकाचे दोन्ही पाय कापलेले होते. याविषयी पोलिसांना माहिती देण्यात आली.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा घटनेचे PHOTOS...