आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Body Measurement Of Women Candidates By Males Hand

महिला उमेदवारांचे शारीरिक मोजमाप पुरुषांच्या हाताने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्तोडगड - वनरक्षक भरतीदरम्यान मंगळवारी महिला उमेदवारांचे शारीरिक माप पुरुषांनी घेतले. यासंबंधीचे छायाचित्र आणि चित्रफीत समोर आल्यानंतर वाद उद्भवला. बुधवारी राजस्थानचे वनमंत्री राजकुमार रिणवा यांना माहिती झाल्यावर माप घेणाऱ्या शिपायाचे निलंबन करण्यात आले.

चित्तोड जिल्ह्यात वनरक्षकाच्या ५७ पदांसाठी २५० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यामध्ये १८ महिला होत्या. स्टेडियमच्या सभागृहात त्यांची छाती आणि उंची मोजण्यात आली. माप घेताना महिला डॉक्टर व रक्षक उपस्थित होते तरीही शिपाई करणपालसिंहने महिलांची मापे घेतली. या प्रकरणात सर्वजण वेगवेगळे स्पष्टीकरण देत आहेत. डॉ. मालासिंह म्हणाले, सुरुवातीस महिला रक्षक मापे घेत होती. तिला व्यवस्थित माप घेता येत नव्हते. त्यामुळे आम्ही पुरुष रक्षकाची मदत घेतली. माझ्या डोक्यात चुकीचे काही नव्हते. वरिष्ठांची मदत मान्य केल्याचे शिपाई म्हणाला. वरसंरक्षक अनुराग भटनागर म्हणाले, शिपायाने नकार द्यावयास हवा होता. या प्रकारात कलंक लावला गेल्याची प्रतिक्रिया मंत्र्यांनी दिली.