आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Body Of 6 Yr Old Girl Found Buried In Maharajganj

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युपी : बलात्कारानंतर 6 वर्षाच्या बालिकेला पुरले, 8, 14 वर्षाचे संशयीत अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : प्रतिकात्‍मक

लखनऊ - युपीच्या महाराजगंज जिल्ह्यात एका 6 वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिला पुरल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना नौतनवा पोलिस ठाण्याच्या रतनपूर गावातील आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या दोघांपैकी एक मुलगा 8 वर्षांचा आहे, तर एक मुलगा 14 वर्षांचा आहे. उत्तर प्रदेशामध्ये गेल्या 48 तासांमध्ये बलात्कार, हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा डझनभर घटना घडल्या आहेत.

एका काम सुरू असलेल्या घरामध्ये काही लोकांना बालिकेचा मृतदेह मिळाला. पावसामुळे याठिकाणी असलेली माती वाहून गेल्याने त्यांना हा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बालिकेची ओळख पटावी म्हणून तिच्या नातेवाईकांना बोलावले. बालिकेवर बलात्कार केल्यानंतर तिला जिवंतच पुरण्यात आल्याचा आरोप तिच्या काकांनी केला आहे. शनिवारी इथर मुलांबरोबर खेळायला गेल्यानंतर ही मुलगी परतलीच नव्हती असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. दिवसभर शोध घेतल्यानंतर रविवारी याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दिल्याचे तिच्या काकांनी सांगितले. त्यांनी अपहरणाची शंका व्यक्त केली होती, तरीही पोलिसांनी हरवल्याची तक्रार दाखल केली, असेही यामुलीचे काका म्हणाले. दुसरीकडे महाराजगंजचे पोलिस अधीक्षक शरद शचान यांनी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याची माहिती दिली आहे. बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.