आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकाला जिवंत करण्यासाठी कबर खोदून केले असे काम, 17 तास सुरू होते मंत्रतंत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साप चावून बालकाचा मृत्यू झाला होता. मांत्रिकाच्या सांगण्यावरून त्याला कबरीतून परत बाहेर काढण्यात आले. - Divya Marathi
साप चावून बालकाचा मृत्यू झाला होता. मांत्रिकाच्या सांगण्यावरून त्याला कबरीतून परत बाहेर काढण्यात आले.
सैंपऊ/धौलपूर - धौलपूरच्या सैंपऊमध्ये साप चावल्याने एका बालकाचा कुटुंबीयांच्या हलगर्जीपणामुळे अवघ्या 40 मिनिटांत मृत्यू झाला. कुटुंबीयांनी बालकाला डॉक्टरांना न दाखवता शुक्रवारी पहाटे 5 वाजता त्याचा देह जंगलातच पुरला. यानंतर सकाळी एका मांत्रिकाच्या म्हणण्यावरून नातेवाइकांनी बालकाचा मृतदेह 7 तासांनी कबर खोदून बाहेर काढला आणि त्याला जिवंत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जंगलातच मंत्रतंत्र करण्यात आले. हा ड्रामा तब्बल 17 तास सुरू होता, परंतु बालक जिवंत झाले नाही. शनिवारी सकाळी 5 वाजता पुन्हा त्याला पुरण्यात करण्यात आले.
 
असे आहे प्रकरण...
- बालकाला जिवंत करण्यासाठी मांत्रिकाच्या म्हणण्यावरून पूर्ण साधनसामग्री गोळा करण्यात आली होती. इकडे तांत्रिकाकडून चक्क मृत बालकाला जिवंत करण्याची बातमी कळताच पूर्ण गावाने तिथे गर्दी करायला सुरुवात केली. 
- मृत छोटू (9) मोहर सिंह गुरुवारी संध्याकाळी चुलीवर बाजरीचे कणीस भाजत होता. यादरम्यान एका सापाने त्याला दंश केला. साप चावल्याची माहिती मिळताच नातेवाइकांनी त्याला सर्वात आधी एका पुजाऱ्याकडे नेले. नातेवाइकांनी छा-छू मध्येच 40 मिनिटे गमावली. यानंतर बालकाचा मृत्यू झाला. बालकाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी त्याचा मृतदेह सकाळी 5 वाजता जंगलात पुरला.
- सकाळी एमपीच्या पिपरीपुरामधील नातेवाइकांनी कुटुंबीयांना सांगितले की, त्यांच्या इथे एका मोठा मांत्रिक बाबा आहे, तो बालकाला जिवंत करून देईल. मग काय, नातेवाइकांनी मांत्रिकाला फोनवरूनच बोलणे करून दिले आणि तो जे-जे सांगत गेला कुटुंबीय त्याप्रमाणे वागत गेले.
 
मातीच्या बेडवर मृतदेह ठेवून कडुलिंबाच्या पानांनी झाकला, बाजूने लावली आग
- संध्याकाळी 5 नंतर मांत्रिकाने नातेवाइकांना म्हटले की, मृतदेहाला मातीच्या बेडवर झोपवून त्याच्या पूर्ण शरीराला कडुलिंबाच्या पानांनी झाका. याशिवाय मृतदेहाच्या नाकात एक नळी टाकून ती बाहेर काढायला सांगितली. कुटुंबीयांनी सांगितल्याप्रमाणे सर्वकाही केले आणि मृतदेहाच्या चारही बाजूने आग लावली.
- यानंतर संध्याकाळी 6 वाजता मांत्रिकाचे गुरू तेथे पोहोचले आणि त्यांनी बालकाला जिवंत करण्यासाठी पूजा-पाठ करणे सुरू केले. दरम्यान, मांत्रिकाचा गुरू एका नळीने थेंब-थेंब काहीतरी औषध मृत बालकाच्या नाकात टाकत होता. रात्री आठपर्यंत मांत्रिकाच्या गुरूचे मंत्रतंत्र सुरू होते, तरीही मृत बालक जिवंत होऊ शकले नाही. 
 
दुपारी 12 ते संध्याकाळी 5 पर्यंत गरम पाण्याने मृतदेहाला अंघोळ
- बालकाच्या मृतदेहाला बाहेर काढल्यानंतर मांत्रिकाने कुटुंबीयांना सांगितले की, मृतदेहाला गरम पाण्याने अंघोळ घाला आणि नंतर शेणाचा लेप लावा. हे पुन्हा पुन्हा करत राहायला सांगितले. मांत्रिकाच्या म्हणण्यावर कुटुंबीयांनी सिलिंडर व इतर सामान घटनास्थळी नेले आणि मृतदेहाला गरम पाण्याने अंघोळ घालत राहिले, वरून शेणाचा लेपही लावत राहिले. दुपारी 12.30 ते संध्याकाळी 5 पर्यंत हेच सर्व सुरू होते.
 
कबरीवर अंथरले ओले कापड, 7 मिनिटांत वाळल्यावर जिवंत होईल बालक
- मांत्रिकाने कुटुंबीयांना सांगितले की, अगोदर कपडा व्यवस्थित भिजवून घ्या, यानंतर तो कबरीवर अंथरा. तो जर 7 मिनिटांत वाळला तर बालक जिवंत होईल. कुटुंबीय म्हणाले, कापड 7 मिनिटांतच वाळले. यानंतर मांत्रिकाच्या म्हणण्यानुसार कुटुंबीयांनी हे सर्व प्रकार सुरू केले.
 
रात्र झाल्याने टाकला शामियाना
- रात्री सुमारे 8 वाजता मांत्रिकाने केलेल्या दिवसभराच्या उपद्व्यापानंतरही बालक काही जिवंत झाले नाही. म्हणून कुटुंबीयांनी जंगलातच छोटा शामियाना टाकणे सुरू केले. सोबतच उजेडासाठी जनरेटरही मागवले. मांत्रिक म्हणायचा की, जोपर्यंत बालक जिवंत होत नाही, तोपर्यंत पूजापाठ सुरूच राहील. रात्री उशिरापर्यंत हा प्रकार सुरूच होता.
- तरीही बालक जिवंत न झाल्याने शनिवारी पहाटे 5 वाजता त्याला पुन्हा जमिनीत पुरण्यात आले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेचे आणखी फोटोज...
सर्व फोटो - जितेंद्र गुप्ता
बातम्या आणखी आहेत...