श्रीनगर- दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमध्ये साेमवारी दहशतवाद्यांनी केलेल्या गाेळीबारात एक पाेलिस अधिकारी शहीद झाला. एएसअाय अब्दुल रशीद मेहंदी असे त्यांचे नाव अाहे. ते कादल येथे कर्तव्य बजावत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गाेळीबार केला. या वेळी त्यांच्याकडे काेणतेही शस्त्र नव्हते. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दाेन गाेळ्या मेहंदी यांच्या पाेटात घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. प्रारंभी त्यांना अनंतनाग जिल्हा रुग्णालयात नेण्यात अाले. त्यानंतर सैन्य दलाच्या रुग्णालयात हलवण्यात अाले; परंतु तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला, असे एका पाेलिस अधिकाऱ्याने सांगितले.