आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२ वर्षे ३ अल्पवयीन मुलींवर भोंदूबाबाचे अत्याचार, न्यूड फोटो दाखवून म्हणायचा असे करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद - येथील नैनी भागात राहाणाऱ्या ३ मुलींसोबत एका भोंदू बाबाने बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. अशी माहिती आहे की बाबा अनेक दिवसांपासून या मुलींवर अत्याचार करत होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे. पोलिस महानिरिक्षकांनी या प्रकरणाची दखल घेतली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

तंत्र-मंत्र करण्याच्या बहाण्याने रुममध्ये बोलवून घेत होता..
- पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 'नैनी येथील त्यांचा घरी २००८ मध्ये अयोध्येतील एक बाबा - जगदीश किरायाने राहायला आला.'
- तो तंत्र-मंत्र आणि प्रवचन करतो. त्याने तक्रारदाराची मुलगी सोनी (१५), भाची आरती (११)आणि राणी (१७) (तिघींचे नाव बदलले आहे) यांच्यावर तीन वर्षांपासून अत्याचार केल्याचे पीडितेच्या पित्याने म्हटले आहे.
- गंडा-दोरा बांधून देतो, असे सांगून तो मुलींना रुममध्ये बोलावून घ्यायचा आणि त्यांच्यावर बलात्कार करत होता. याशिवाय आणखी एका मुलगी त्याची शिकार झाली आहे.
- जगदीशने मुलींचे न्यूड फोटो मोबाइलवर क्लिक केले होते. ते इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी देऊन तो त्यांच्यासोबत गैरकृत्य करीत होता.
- मुलींनी त्याच्या काळ्या कारनाम्याची कुठेही वाच्यता करु नये यासाठी तो त्यांना तंत्र-मंत्रांना तुमच्या कुटुंबाला संपवून टाकेल अशी धमकी द्यायचा.
- १८ नोव्हेंबर रोजी पीडित मुलीने रडत-रडत संपूर्ण घटना कुटुंबातील व्यक्तींना सांगितली.
- सोनी आणि आरतीनेही त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती कुटुंबियांना दिली.
- पीडितेच्या पित्याने जगदीशविरोधात तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी हे आपसातील प्रकरण असल्याचे सांगत टाळाटाळ केली.
- अनेकदा पोलिस स्टेशनला यरझऱ्या मारूनही उपयोग झाला नाही. पोलिसांनी भांदू बाबावर कोणतीही कारवाई केली नाही.
- पीडितेच्या वडिलांनी जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कारवाईची विनंती केली तेव्हा यंत्रणा हलली.
पोलिस म्हणाले जमीनीचा वाद
- नैनीचे पोलिस अधिकारी अशोक कुमार म्हणाले, काही वर्षांपूर्वी आरोपी जगदीश येथे भाड्याने राहायला आला होता.
- पीडितेच्या वडिलांनी त्याला काही जमीन दिली होती. त्यांनी ती परत मागितल्यानंतर आरोपी जगदीश आणि त्यांच्यात वाद झाला.
- तर, पीडित मुलींच्या वडिलांचे म्हणणे आहे, की हे सत्य नाही. जगदीश जेव्हा आमच्या घरी किरायाने राहायला आला आणि आम्हाला कळाले की तो बाबा आहे, त्याने आम्ही प्रभावित झालो होतो. त्यामुळेच त्याला काही जमीन दिली होती.
- परंतू जमीनीचा आणि या आरोपांचा काही संबंध नाही. मला जमीन नाही मिळाली तरी चालेल, मात्र माझ्या मुलींवर जे अत्याचार झाले त्याची शिक्षा जगदीशला मिळाली पाहिजे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पीडित मुलींचे कुटुंब...
बातम्या आणखी आहेत...