आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायबरेलीतील एनटीपीसीत बॉयलरचा स्फाेट; 25 ठार, 100 हून अधिक जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायबरेली - उत्तर प्रदेशातील एनटीपीसी विद्युत प्रकल्पाचा बॉयलर फुटला. या दुर्घटनेत २५ मजूर ठार झाले आहेत, तर १०० हून अधिक मजूर गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येते. ही दुर्घटना रायबरेली जिल्ह्यातील उंचाहार येथील ५०० मेगावॅट विद्युत प्रकल्पाच्या युनिट क्रमांक ६ ची आहे. येथील बॉयलरचा स्टीम पाइप फुटल्याचे कारण सांगण्यात येते. जखमीमध्ये सहायक सरव्यवस्थापक दर्जाच्या चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे.  दरम्यान, राहुल गांधी पीडितांना भेटण्यासाठी रायबरेलीला पोहोचले आहेत. 
 
(व्हिडिओ पाहा पुढील स्लाइडवर)
 
राहुल गांधींनी बुधवारी केले होते ट्वीट.. 
- माहिती मिळताच राहुल गांधींनी बुधवारी दुःख व्यक्त केले होते. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले, रायबरेली NTPC प्लान्टच्या घटनेने मन विचलित झाले आहे. मृतांच्या कुटुंबीयांबद्दल माझ्या संवेदना आहेत. प्रशासनाने जखमींना तत्काळ मदत द्यावी अशी मागणी मी करतो. 
- रात्री उशिरा पाहुल यांनी ट्वीट केले की, NTPC मधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मी उद्या 1 नोव्हेंबरला रायबरेलीला जाईल. पुढे दुपारी मी गुजरात नवसर्जनयात्रेत जाईळ.  
- सोनिया गांधींनीही या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. रायबरेली सोनिया गांधींचा मतदारसंघ आहे. 

पोलिस अधीक्षक शिवहरी मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेत सुमारे १०० हून अधिक मजूर जखमी झाले. मजुरांच्या नातेवाइकांनी प्रकल्पाबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या दुर्घटनेनंतर एनटीपीसीचच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. रायबरेली येथील जिल्हाधिकारी संजय खत्री यांनी सांगितले, एनटीपीसीच्या प्रकल्पात  प्रेशरमुळे अॅश पाइप फुटला. त्यामुळे ही दुर्घटना झाली. जखमींना लखनऊ, अलाहाबाद आणि रायबरेली येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी प्रधान सचिव (गृह) यांना बचावकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या दरम्यान, काही मजूर बेपत्ता झाल्याचेही सांगण्यात येते. यामुळे नातेवाइकात अस्वस्थता पसरलेली दिसून आली.   

सीआयएसएफने प्रकल्पाची सुरक्षा व्यवस्था घेतली
दुर्घटनेनंतर लगेच विद्युत केंद्रास केंद्रीय राज्य राखीव दलाने बंदोबस्ताची जबाबदारी स्वीकारली असून चोहोबाजूने सुरक्षा बंदोबस्त तैनात केला. बाहेरील व्यक्तीस तेथे प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला. महत्वाच्या व्यक्तींनाच तेथे प्रवेश दिला जात आहे.
 
१५० मजूर होते कामावर  
रायबरेलीचे जिल्हाधिकारी संजय खत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सुमारे १०० लोक जखमी झाले. दुर्घटनेत एनटीपीसीचे सहायक सरव्यवस्थापक संजीवकुमार शर्मा, प्रभात श्रीवास्तव आणि मिश्रीराम जखमी झाले. दुर्घटना घडत असताना प्रकल्पात सुमारे १५० मजूर काम करत होते. लखनऊ येथील आयुक्त व पोलिस महानिरीक्षक घटनास्थळी दाखल झाले.  
 
 
मृतांच्या नातेवाइकांना २ लाखांची नुकसान भरपाई 
एनटीपीसीमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने मृतांच्या वारसांना २-२ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. गंभीर जखमी झालेल्यांना ५० हजार, तर साधारण जखमींना २५-२५ हजार रुपये मदत देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी मॉरिशस दौऱ्यावर गेले आहेत. गृह सचिव बचावकार्य गतीने करत आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, दुर्घटनेनंतरचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...