आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेडरूमसाठी कंगनाने मागवले खास सामान, येथे तयार होतेय नवे घर, असा आहे नजारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंगनाचे नवे घर कुल्लूच्या खास काष्ठकुणी शैलीत बांधण्यात आले आहे. - Divya Marathi
कंगनाचे नवे घर कुल्लूच्या खास काष्ठकुणी शैलीत बांधण्यात आले आहे.
मनाली - अॅक्ट्रेस कंगना रनोटचे नवे घर तयार झाले आहे. या वेळी कंगना दिवाळी तिच्या नव्या घरात साजरी करणार आहे. हे घर कुल्लू आणि मनालीच्या परंपरागत काष्ठकुणी शैली बनलेले आहे. कंगनाचे वडील अमरदीप रनोट म्हणाले की, दिवाळीच्या आधी गृहप्रवेश होईल. सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
- सूत्रांनुसार, मनालीच्या सिमसा गावात बनत असलेल्या कंगनाच्या घराच्या फर्निंशिंगचे काम जोरात सुरू आहे. हे घर दिवाळीच्या आधी कंगनाला सोपवण्यात येईल. कंगनाच्या घराची निर्मिती लोकल काँट्रॅक्टरच करत आहेत. परंतु घरची डिझाइनिंग मुंबईच्या इंजिनिअर्सनी केली आहे. बेडरूममध्ये लावण्यात येणारे डेकोरेशन, फर्निचर आदी विदेशातून मागवण्यात आले आहे. ठेकेदार प्रताप म्हणाला की, तिचे हे घर जवळपास पूर्ण होत आले आहे.
- कंगनाचे वडील अमरदीप रनोट म्हणाले की, कुल्लूच्या काष्ठकुणी शैलीत घर बांधण्यामागे भूकंपरोधी घराचा विचार आहे. त्यांनी खुलासा केला की, मुंबईहून आलेल्या वास्तुतज्ञांनी या शैलीचे कौतुक केले आहे. काष्ठकुणी शैलीत दगडांदरम्यान लाकडाच्या लांब-लांब पट्ट्यांचा वापर केला जातो. ही लाकडे कोपऱ्यांमध्ये एकेमकांना जुळलेली असतात.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...