आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळमध्ये रास्व संघाच्या कार्यालयाबाहेर बॉम्बस्फोट, तीन स्वयंसेवक जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केरळमध्ये रास्व संघाच्या कार्यालयाबाहेर हा हल्ला झाला. - Divya Marathi
केरळमध्ये रास्व संघाच्या कार्यालयाबाहेर हा हल्ला झाला.
कोझीकोड - केरळमधील कम्युनिस्टांच्या हिंसेविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने केलेल्या निदर्शनाला 24 तासही उलटत नाही तोच संघाच्या कार्यालयाबाहेर बॉम्बस्फोट झाला आहे. स्फोट कोणी घडविला याची अद्याप माहिती नाही.
 
कुठे झाला बॉम्बस्फोट 
केरळमधील कोझीकोड जिल्ह्यातील कल्लाची येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाजवळ बॉम्बस्फोट घडविण्यात आला. हल्ल्यात संघाचे तीन स्वयंसेवक जखमी झाले आहे. जखमींना कोझीकोड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 
 
घटनास्थळी बॉम्ब स्कॉड 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, हल्ला गुरुवारी रात्री कोझीकोड येथील नाडापूरमजवळील कल्लाची येथे आरएसएस ऑफिस बाहेर झाला. 
- बॉम्बस्फोटानंतर पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढविला आहे. बॉम्ब स्कॉडने घटनास्थळी पोहोचून या घातपाताचे पुरावे गोळा केले.
- केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षांच्या आणि डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप कार्यकर्त्यांवर हिंसक हल्ले केले जात असल्याच्या निषेधार्थ 1 मार्च रोजी देशातील 160 शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली होती. 
- उज्जैन येथे आरएसएस नेते कुंदन चंद्रावत यांनी कम्युनिस्टांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. 
- केरळमधील आरएसएस आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येला तेथील मुख्यमंत्री पिनराई विजयन जबाबदार असल्याचा आरोप करत उजैन येथील संघाचे सहप्रचारप्रमुख कुंदन चंद्रावत यांनी थेट विजयन यांचा शिरच्छेद करणाऱ्यात एक कोटीचे बक्षीस जाहीर केले. 
- केरळमधील संघपरिवाराच्या कार्यकर्त्यांवरील वाढत्या हल्ल्याविरोधात आयोजित सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. 
- माझी सर्व संपत्ती मी विजयन यांच्या मारेकऱ्यांच्या नावे करेन, असेही ते म्हणाले. 
- संघाने मात्र आपल्या प्रचारकाच्या वक्तव्याशी आमचा संबंध नसल्याचे म्हटले होते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...