आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच मिळणार आनंदाचा फॉर्म्युला, दलाई लामा-टुटू यांचे पुस्तक लवकरच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोघांचे काम रविवारपासून सुरू, लोकांकडून फेसबुकवर मागवले प्रश्न, पुढील वर्षी येणार ‘बुक ऑफ जॉय’

धर्मशाला - आनंदाचा कुठला फॉर्म्युला असू शकतो? शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते दलाई लामा आणि आर्चबिशप डेस्मंड टुटू त्याच्या शोधात आहेत. दोघांचेही जीवन संघर्षमय होते. पण त्यांच्या चेह-यावर नेहमीच हास्य होते. ते कसे? ते सांगण्यासाठीच दोघेही आनंदावर एक पुस्तक लिहीत आहेत. टुटू आफ्रिकेहून त्यासाठी आले आहेत. पुस्तकाचे नाव असेल-‘द बुक ऑफ जॉय : फाइंडिंग हॅपिनेस इन अॅन अनसर्टन वर्ल्ड.’ ते पुढील वर्षी प्रकाशित होईल. दोघांच्या फेसबुक पेजवर ‘आस्क फॉर जॉय’लिंकवर तुम्हीही प्रश्न विचारू शकता. डाउग अब्राहम त्यांना अंतिम रूप देतील.
दोघांचाही संदेश एकच : आनंद स्वत:मध्ये शोधा
आनंदाचा स्रोत आमच्या हृदयातच आहे. कितीही कमवा, स्टेटस मिळवा. या बाह्य गोष्टी आनंद देऊच शकत नाहीत - दलाई लामा
आयुष्यात एवढी आव्हाने येऊ शकतात. सर्वकाही संपले असे वाटते.तरीही आनंदाचे अंकुर फुटत राहतात -
डेस्मंड टुटू
प्रश्न येणे सुरू, उत्तरासाठी सध्या ५ प्रश्नांची निवड
- तुमच्या आप्ताचा मृत्यू झाल्यास त्यात आनंद कसा शोधाल?
- तुम्ही स्वत:च्या आत आनंद शोधण्यास सांगता. माझे आयुष्य बाह्य गोष्टींवर अवलंबून असताना मी स्वत:च्या आतील आनंद कसा शोधू?
- चुका केल्या. अपयशी ठरलो. प्रकाश दिसत नाही. आनंदी कसा राहू?
- जगात युद्ध सुरू आहे. दहशतवाद, भूकबळी, प्रदूषण, मारामा-या सुरू आहेत. अशा स्थितीत जगात कोणी आनंदी कसे राहू शकते?
- आम्हाला दुस-याच्या यशामुळे चीड येते. त्यापासून बचाव कसा करावा?