आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न, चकमकीत 1 अतिरेकी ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू  - बीएसएफच्या राजौरी जिल्ह्यातील केरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यादरम्यान झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. त्याचे तीन साथीदार पलायन करण्यात यशस्वी झाले.
 
सकाळी दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून त्याच्यासोबत काही शस्त्रेही जप्त करण्यात आली. संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दहशतवाद्यांकडून होणारे सर्व प्रयत्न हाणून पाडू, असा निर्धार येथील भारतीय लष्कर स्थानकाने व्यक्त केला.  

सोमवारी रात्री उशिरा केरी सेक्टरमध्ये तैनात बीएसएफच्या १६३ बटालियनच्या जवानांना नियंत्रण रेषेजवळ काही हालचाली जाणवल्या. अंधाराचा फायदा घेत सशस्त्र दहशतवाद्यांचा गट घुसखोरी करत असल्याचे दिसून आले. त्यानंतर बीएसएफ जवानांनी त्यांच्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला.
 
तासभर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. यात एक दहशतवादी ठार झाला. त्याच्या साथीदारांना पलायन करण्यात यश आले. पाकिस्तानने एकीकडे दहशताद्यांच्या विरोधातील मोहिम तीव्र केली. मात्र सीमेवरील घुसखोरी सुरूच आहे, हे वास्तव घटनेने समाेर आले. 
 
शोधमोहिमेत रायफल, नाइट व्हिजन कॅमेरा सापडला 
सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम हाती घेतली. यादरम्यान दहशतवाद्याचा मृतदेह सापडला. त्याच्याजवळ एक एके ४७ रायफल, ६ जिवंत काडतुसे होती. एका बॅगेत नाइट व्हिजन डिव्हाइस, काडतुसे, सुक्यामेव्याचा ज्यूस आणि इतर काही सामान होते. गेल्या काही दिवसांपासून या सीमा क्षेत्रात दहशतवाद्यांच्या हालचाली असल्याचे दिसून आले होते. मात्र, सुरक्षा कडे मजबूत असल्याने घुसखोरी शक्य होत नव्हती. जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.
 
बातम्या आणखी आहेत...