आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boulders Fell On Gurdwara Manikaran Sahib Due To A Landslid

PHOTOS : हिमाचलप्रदेशमध्‍ये गुरुद्वारावर दरड कोसळली; दहा भाविक ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोंगर पडल्‍याने भक्‍तनिवासाची अशी अवस्‍था झाली. - Divya Marathi
डोंगर पडल्‍याने भक्‍तनिवासाची अशी अवस्‍था झाली.
कुल्लू (हिमाचल प्रदेश) - हिमाचल प्रदेशच्‍या कुल्लू जिल्‍ह्यातील मणिकारण साहिब गुरुद्वारावर आज (मंगळवार) दुपारी दरड कोसळली. यात 10 जणांचा मृत्‍यू झाला असून, ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले आहेत. त्‍यांना बाहेर काढण्‍याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेत मृताचा आकडा वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे.

का घडली दुर्घटना
या पंधरवड्यात कुल्लूमध्ये मुसळधार पाऊस होता. त्यानंतर आज, मंगळवारी कडक उन्ह पडले. त्यामुळे डोंगरावर मोठी भेग पडली. त्यानंतर दुपारी ५०० मीटच्या उंचावरून दरड कोसळून कोसळून काही भाग गुरुद्वारा मणिकरण साहिबच्या इमारतीवर पडला तर काही नदीमध्ये.

उकळत्या कुंडामुळे प्रसिद्ध
मणिकर्ण हे ठिकाण कुल्लू जिल्ह्यात आहे. या ठिकाणी असलेल्‍या कुंडातून उकळते पाणी निघते. कडाक्‍याच्‍या थंडीमध्‍ये हे पाणी 95 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक गरम असते. त्‍यामुळे हे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथून कुल्‍लू 45 किमी तर मनाली 85 किलोमीटर अंतरावर आहे. येथे शिव आणि रामचंद्र मंदिर आहे. त्‍यामुळे देशभरातील भाविक येथे हजेरी लावतात.
गुरद्वारा मणिकरण साहिब कुठे ?
पार्वती नदीच्‍या किनाऱ्यावर गुरद्वारा आहे. या ठिकाणी गुरू नानकदेव आले होते. त्‍यांच्‍यासोबत असलेला मरदाना यांच्‍यासाठी येथे लंगर लावला होता. त्‍यावेळी नानक यांनी मरदाना यांना एक दगड बाजूला करण्‍याचे सांगितले. त्‍यांनी दगड बाजूला करताच उकळते पाणी निघाले. त्‍यात अन्‍न शिजवण्‍यात आले, अशी अख्‍यायिका आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज..