आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीचा प्रायव्हेट फोटो व्हॉट्सअॅपवर टाकून त्याने लिहिली चिठ्ठी, तरुणीने दिली होती धमकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरेशने मृत्यूआधी ही चिठ्ठी व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकली होती. - Divya Marathi
सुरेशने मृत्यूआधी ही चिठ्ठी व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकली होती.
श्रीगंगानगर - राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात एका मुलाचा खून करून मृतदेह कालव्यात फेकण्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनाक्रमात बुधवारी एका तरुणीला आणि दोन मुलांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मुलाने त्याच्या खुनाआधी एक चिठ्ठी लिहिली होती. ज्यात त्याने आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगितले होते.
 
गर्लफ्रेंडचा फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला आणि चिठ्ठी लिहिली
- जाखडांवाली गावात राहणारा सुरेश सुथार 8 दिवसांपूर्वी गायब झाला होता. सुरेशचा शोध घेण्यात आला तेव्हा कालव्याच्या किनारी त्याची एक चिठ्ठी आढळली. या चिठ्ठीत त्याने त्याच्या मृत्यूचे कारण त्याची गर्लफ्रेंड आणि दोन तरुणांना सांगितले. ते त्याला सतत त्रास देत होते.
- सुसाइड नोटमध्ये लिहिले होते की,
"माझे एका मुलीशी प्रेमप्रकरण सुरू होते.  ती मुलगी इतर दोन मुलांसह मला सुरतगढच्या कालव्यावर बोलवत होती. त्यांना माझा खून करायचा आहे. सर्वांना माझे प्रेम. पप्पा, मला माफ करा आणि फोन कॉलचे डिटेल काढा."
- पोलिसांना सुरेशचा मृतदेह मंगळवारी संध्याकाळी कालव्यात आढळला. सुरेशचा भाऊ राम सुथारने चिठ्ठीच्या आधारे तरुणी आणि दोन मुलांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
- मृतदेह हस्तगत केल्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आले. नंतर नातेवाइकांना सुरेशचा देह सोपवण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तरुणी आणि दोन्ही मुलांवर 301 आणि 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, घटनेचे आणखी फोटोज
फोटो क्रेडिट- भजनलाल सुथार
बातम्या आणखी आहेत...