आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना आयडी हॉटेलमध्ये महिलेसोबत केली रूम बुक, विवस्त्रावस्थेत लोकांनी केली मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालोतरा (राजस्थान) - येथे एका हॉटेलमध्ये विवाहितेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळलेल्या तरुणाला गर्दीने बेदम मारहाण केली. यानंतर विवस्त्रावस्थेत हॉटेलच्या खाली बेशुद्धावस्थेत त्याला सोडले. मुख्य मार्गावर विवस्त्रावस्थेत तरुणाला मारहाण होताना पाहून पाहणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे महामार्गावर मोठा जाम लागला होता.
 
असे आहे पूर्ण प्रकरण...
- पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाडूं खाँ विवाहितेसह एका हॉटेलमध्ये गेला, तेथे रूम बूक करून तो थांबला होता. ही माहिती मिळताच तेथे पोहाचलेल्या लोकांनी रूम उघडून त्याला बाहेर काढले आणि मारहाण सुरू केली. 15-20 मिनिटे तरुणाला लोक मारहाण करत होते. यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमी तरुणाला त्यांच्या तावडीतून सोडवून रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचारांनंतर त्याला जोधपूरला रेफर करण्यात आले.
 
हॉटेल संचालकाला घेतले ताब्यात...
- विना आयडीचा हॉटेलमध्ये थांबल्याने पोलिसांनी हॉटेल संचालकाला ताब्यात घेतले. तसेच दोन अल्पवयीन मुलांनाही हॉटेलमध्ये काम करत असल्याचे आढळल्याने ताब्यात घेतले आहे. शहरात बहुतांश हॉटेलमध्ये विना आयडीचे रूम बुक केल्या जातात. अशा वेळी एखादी घटना घडल्यास संबंधित व्यक्तीची ओळख हॉटेल चालकाकडे नसते.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित घटनेचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...