आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप ट्रॅक्टर चालवत होता, मागे बसलेला चिमुकला किंचाळून म्हणाला- माझा हात तर मागेच राहिलाय!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिमुकल्याचा हाता खांद्यापासून तुटून पडला होता. - Divya Marathi
चिमुकल्याचा हाता खांद्यापासून तुटून पडला होता.
जोधपूर - हातावर पट्ट्या बांधलेला 9 वर्षांचा बबलू मंगळवारी घरी आलेला पाहून सर्वांची मने सुन्न झाली होती. प्रत्येक जण त्याची तऱ्हेतऱ्हेने समजूत घालत होता, धीर देत होता. प्रत्येक जण त्याची आपापल्या पद्धतीने समजूत घालत होता. 
- खरेतर बबलूचा एवढा भीषण अपघात झाला होता की पाहणाऱ्यांचाही थरकाप उडाला. ट्रॅक्टरमध्ये वडिलांसोबत बसून जाताना या चिमुकल्याचा हात खांद्यापासून तुटून पडला होता.
ट्रॅक्टरवर स्वार बापाला म्हणाला- माझा हात मागेच राहिला
- चिरढाणी गावात बबलू रविवारी त्याचे वडील गेपरराम यांच्यासह शेतात गेला होता. तेथे दोघांनी ट्रॉलीमध्ये कडबा भरला आणि दोरीने बांधला.
- परत येताना दोरीचे एक टोक खाली लांबत होते. हे पाहून ट्रॅक्टरच्या मागे बसलेल्या बबलूने ते लपेटून आपल्या हातात घेतले. रस्त्यात नदीच्या काठावर ट्रॉलीला झटका बसला आणि दोरीचे ते टोक टायरच्या खाली दबले, जे बबलूने हाताला गुंडाळले होते. 
- चिमुकला जोरात किंचाळला, पण ट्रॅक्टर चालवणाऱ्या बापाला लवकर लक्षातच आले नाही. त्याने ओरडतच सांगितले की, पप्पा, माझा हात तर मागेच राहिलाय... हे ऐकून वडलांना धक्काच बसला.
- त्यांनी त्वरित ट्रॅक्टर थांबवले, कटलेला हात उचलला आणि हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तेथून त्याला जोधपूरला रेफर करण्यात आले. मग बापाने हातात बबलू आणि दुसऱ्यात त्याचा कटलेला हात पकडून जोधपूरच्या खासगी रुग्णालयात नेले. पण उशीर झाल्यामुळे हात जोडता आला नाही.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, दुर्दैवी घटनेचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...