आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांच्या अफेअरमध्ये GF करायची अनेक डिमांड, BF ने 2 गोळ्यात संपवली कहानी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विवाहित रोशनीचा तिचा बॉयफ्रेंड ईश्वरने गोळ्या झाडून खून केला. - Divya Marathi
विवाहित रोशनीचा तिचा बॉयफ्रेंड ईश्वरने गोळ्या झाडून खून केला.
सुलतानपूर - उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमध्ये एका युवकाने त्याच्या गर्लफ्रेंडला यासाठी मारले की ती वारंवार गिफ्ट आणि पैशांची मागणी करत होती. युवकाने गुरुवारी स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. विशेष म्हणजे 30 जुलै रोजी सुलतानपूरमधील एका फार्म हाऊसजवळ एका महिलेची डेड बॉडी सापडली होती. पोलिसांनी या प्रकरणी महिलेचा बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. 
 
3 वर्षे चालेल अफेअर 
- पोलिस अधीक्षक अमित वर्मांनी सांगितले, की जवळपास तीन वर्षे युवक आणि महिलेचे अफेअर सुरु होते. 
- कुडवार पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या इसरौली गावातील प्रभु उपाध्याय याची पत्नी रोशनीचे ईश्वरसोबत अफेअर सुरु होते. 
- विवाहित रोशनी रोजच्या रोज ईश्वरकडे नवनवीन गिफ्टची मागणी करायची. त्याच्याकडे पैसे मागायची. 
- विवाहित गर्लफ्रेंडच्या पैसे आणि गिफ्टच्या मागणीने वैतागलेल्या ईश्वरन मित्र राजूला सोबत घेऊन तिचा काटा काढण्याच निश्चय केला. 
- पोलिस अधीक्षक वर्मांचा दावा आहे, की या खूनामागे दुसरा कोणताही मोठा उद्देश नव्हता. 
 
दारु पिऊन केला खून 
- पोलिस अधीक्षक वर्मांनी सांगितले, की ईश्वर आणि राजू, रोशनीला संपवण्यापूर्वी भरपूर दारु प्याले होते. त्यांनी रोशनीवर दोन गोळ्या झाडल्या आणि मृतदेह ऊसाच्या शेतात फेकून ते घरी परत आले. 
- दोघेही सराइत गुन्हेगार नाहीत, ईश्वरने गर्लफ्रेंडच्या मागण्यांना वैतागून तिचा खून केला तर राजूने मैत्री खातर त्याच्या गुन्ह्यात त्याला साथ दिली.
 
पोलिस पथकाला 5 हजारांचे बक्षिस 
- पोलिसांनी या खूनाचा आठ दिवसांत तपास लावला. हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र जप्त केले आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. 
- पोलिस अधीक्षकांनी खूनाचा तपास करणाऱ्या पथकाला रोख पाच हजार रुपये बक्षिस दिले आहे. 
 
30 जुलैला सापडला होता महिलेचा मृतदेह 
- कुडवार पोलिस स्टेशन अंतर्गत वन विभागाच्या फार्म हाऊसजवळ झुडपामध्ये 30 जुलै रोजी एका महिलेचा मृतदेह सापडला होता. 
- मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि रोशनीचे अनैतिक संबंध असलेल्या इश्वर व त्याचा मित्र राजूला ताब्यात घेतले. 
बातम्या आणखी आहेत...