आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boy Murdered As Human Sacrifice Bhagwanpur In Chhattisgarh

मृत वडिलांच्‍या आत्‍म्‍याच्या शांतीसाठी दिला पोटच्‍या पोराचा बळी, केला शिरच्‍छेद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
100 मीटरच्‍या अंतरावर धड आणि शिर होते. - Divya Marathi
100 मीटरच्‍या अंतरावर धड आणि शिर होते.
रायपूर/रायगड - छत्‍तीसगडमधीलल रायगड जिल्‍ह्यामधील भगवानपूर परिसरात एका 14 वर्षांच्‍या मुलाचा शिरच्‍छेद करून नरबळी दिल्‍याचा प्रकार 7 जानेवारीला उघडकीस आला होता. बाजूलाच पूजेचे साहित्‍य आणि दारूच्‍या बॉटलही होत्‍या. चंदन भारती (14) असे मृताचे नाव असून, त्‍याचा पिता रणविजय भारती यानेच आपल्‍या मृत वडिलांच्‍या आत्‍म्‍यास शांती मिळावी म्‍हणून हा नरबळी दिल्‍याचा संशय पोलिसांनी व्‍यक्‍त केला.

काय आहे प्रकरण ?
- 7 जानेवारीला पोलिसांना एका शेतात अनोळखी मुलाचा मृतदेह आढळून आला होता.
- पूजा करून त्‍याचे शिर धडावेगळे करण्‍यात आले होते.
- पोलिसांनी केलेल्‍या तपासात या मुलाची ओळख पटली.
- तो खैरपूर येथील रहिवासी आहे.
वडिलांवर का आहे संशय ?
- पोलिसांनी परिसरातील दुकानांचे सीसीटीव्‍ही फुटेज तपासले.
- यामध्‍ये चंदन हा 6 जानेवारीला त्‍याच्‍या वडिलांसोबत दिसत आहे.
- त्‍याच दिवसापासून तो गायब होता.
- रणविजय भारती हा भूत पिश्‍चावर विश्‍वास ठेवतो.
- एवढेच नाही आपले मृत वडिलांचा आत्‍मा आपल्‍या मागे लागल्‍याचेही नातेवाईक, मित्रांना सांगत होता.
चार ते पाच दिवसांपासून होतेय पूजा
- ज्‍या ठिकाणी चंदन याचे शिर आणि धड आढळून आले त्‍या ठिकाणी काही लोक चार ते पाच दिवसांपासून पूजा करत असल्‍याचे स्‍थानिक नागरिकांनी सांगितले.
- त्‍यामुळे या प्रकरणात केवळ मृत मुलाचा पिता रणविजयच नाही तर इतरही काही जण सहभागी असावेत, असा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे.
रणविजय विकतो बांगड्या
मृत मुलाचा पिता रणविजय हा मूळ उत्‍तर प्रदेशातील आजमगडचा रहिवासी आहे. मागील 10 वर्षांपासून ते खैरपूर येथे किरायाने राहतो. सुरुवातीला त्‍याने नळजोडणीचे काम केले. मात्र, आता दारोदारी जावून बांगड्या विकण्‍याचे काम करतो.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
टीप - पुढील फोटो तुम्‍हाला विचलित करू शकतात...
(सर्व फोटो: लक्ष्मीधर पात्रा)