आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गर्लफेन्डला पार्टी देण्यासाठी तरूणाची शक्कल, एटीएम मशीन न फोडता अशी केली चोरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गर्लफेंडसोबत जाऊन एटीएममध्ये केली चोरी - Divya Marathi
गर्लफेंडसोबत जाऊन एटीएममध्ये केली चोरी

इंदूर- गर्लफ्रेंडसोबत पार्टी करण्यासाठी एका व्यक्तीने एटीएममध्ये चोरी करून सहा हजार रूपये चोरले. हा चोर दुसरा तिसरा कोणी नसून एटीएममध्ये पैसे टाकणारा कंपनीचा कर्माचारी होता. त्याने मशिनाचा पासवर्ड टाकून पैसे चोरले होते, त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला यामध्ये साथ दिली होती. पोलिसांनी आरोपीसह त्याच्या दोन साथिदारांना अटक केली असून आरोपीच्या गर्लफ्रेडचा शोध सूरू आहे.


- एसपी संपत उपाध्याय यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी  नंदानगरच्या एका व्यक्तिने पोलिसांना एटीएममध्ये तिन युवकांसह एक युवती उभी आहे आणि दोन तरूण एटीएममधून पैसे काढत असल्याची माहिती दिली होती. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले, परंतु तिथे चोरीचे कुठलेच निशान आढळून आले नाही.
- दुसऱ्या दिवशी पोलिसांनी बँक मॅनेजरला फोन केला, तेव्हा त्यांनीही अशी कोणतीही घटना झाली नसल्याचे सांगितले आणि एटीएममध्ये कॅश जमा करणाऱ्या कंपनीशी संपर्क करण्यास सांगितले. यानंतर पोलिसांनी बँक व्यवस्थापकाला भेटून एटीएमचे सीसीटीव्ही फूटेज चेक केले, तेव्हा तीन युवक आणि एक तरूणी एटीएम मशीनमधून पैसे काढताना दिसून आले. यात हैरान करणारी बाबा म्हणजे एटीएममधून पैसे काढण्यासाठी त्यांनी कुठलीच तोडफोड केलेली नव्हती, तर पासवर्ड टाकून मशीन उघडले आणि त्यातून पैसे चोरले होते.
- हे पाहून पोलिसांना कळून चुकले की, चोरी करणारा व्यक्ती एटीएमची सर्व माहिती असणाराच आहे. पोलिसांनी एटीएम कॅश मॅनेज करणाऱ्या कंपनीची चौकशी केली. सुरूवातीला कंपनीचे अधिकारी अशी कुठलीही घटना घडल्यास नकार देत होते, परंतु पोलिसांनी त्यांना सीसीटीव्ही फुटेज दाखवले तेव्हा त्यांची बोलती बंद झाली.
- एटीएममध्ये चोरी करणारा व्यक्ती त्यांचाच कर्मचारी होता. फुटेजच्या आधारावर पोलिसांना आरोपी कर्मचारी मनीष वाधवानी, विकास आणि धर्मेश यांना अटक केली आहे. चौकशी दरम्यान मनीषने सांगितले की, त्याला गर्लफ्रेडसोबत पार्टी करायची होती, त्यासाठी पैसे हवे होते. त्यामुळे सहकारी मित्र विकाससोबत एटीएममधून पैसे काढण्याचा प्लॅन बनवला.
- या एटीएममध्ये पैसे टाकण्याचे काम मनीष करत होता, त्यामुळे त्याला मशीनचा पासवर्ड माहित होता. मनीष विकास आणि धर्मेश यांना घेऊन एटीएमवर पोहोचला, कोणाला शंका येऊ नये म्हणून त्याने गर्लफ्रेंडलाही सोबत आणले आणि एटीएममध्ये चोरी केली. पोलिस आता मनीषच्या गर्लफ्रेंडचा शोध घेत आहे. ती अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे.


पुढील स्लाइडवर पाहा आणखी फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...