आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री मोठ्या भावाच्या सालीला भेटायला गेला, लोकांनी पकडून लावून दिले लग्न...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छपरा (बिहार)- ऐन मध्यरात्री मोठ्या भावाच्या सालीला भेटायला गेलेल्या तरूणाचा तिथेच विवाह लावून देण्यात आल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. मुलीच्या खोलीत एक मुलगा असल्याची बातमी कळताच सर्व गावकऱ्यांनी घरासमोर एकच गर्दी केली, तरूणाचे काय करायचे यासाठी रात्रीच पंचायत बोलवण्यात आली. त्याच्या घरच्यांना बोलवण्यात आले आणि दोन्ही पक्षातील लोकांना मान्य झाल्यानंतर दोघांचे लग्न लावून देण्यात आले. ही घटना बिहारच्या सारण जिल्ह्यातील मुडवा एराजी येथील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विकास कुमार हा युवक मोठ्या भावाच्या सालीला भेटण्यासाठी शनिवारी रात्री भावाच्या सासरवाडीला गेला होता. घरातील काम आवरल्यानंतर मोठ्या भावाची साली खोलीत आली. खोलीतून आवज ऐकू आल्याने घरातील लोक जागे झाले. मुलीला दरवाजा उघडण्यास सांगितले, तेव्हा त्या खोलीत हा युवक आढळून आला.

अशी झाली सुरूवात...
- पानापूर प्रखंड येथील जीपूरा गावातील तरूण विकास कुमार कोणत्या ना कोणत्या कारणाने मोठ्या वहिणीच्या बहिणीला भेटायला जात होता. दरम्यान दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले. सहा महिण्यापर्यंत दोघेही एकमेकांना लपून-छपून भेटत राहिले.
- शनिवारी रात्री 9 वाजेच्या दरम्यान युवक-मोठ्या भावाच्या सालीच्या रूममध्ये होता. यावेळी घरातील लोकांना त्यांच्या खोलीतून आवाज ऐकू आले. 
- लोकांना जबरदस्तीने दरवाजा उघडण्यास सांगितले आणि पाहतात तर काय समोर प्रेयसी आणि प्रियकर दोघे सोबत होते. 
- ही बातमी गावात पसरल्याने एकच गर्दी झाली. रात्रभर युवकाला घरातच ठेवण्यात आले. सकाळी त्याच्या घरच्यांना बोलवून, गावात पंचायत बोलवण्यात आली.
- पंचायतीत प्रेमी युगुलाने आपण एकमेकांवर प्रेम करत असल्याचे सांगितल्यानंतर लोकांना दोघांचे लग्न लावून देण्याचा सल्ला दिला.
- त्यानंतर दोघांचे लग्न लावून देण्यात आले. दरम्यान, हा प्रकार पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

पुढील स्लाइडवर पाहा फोटोज्....
बातम्या आणखी आहेत...