(फोटो- झाडाला लटकलेले प्रेमीयुगुलाचे मृतदेह)
मुझफ्फरनगर- एका प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या केलेला युवक हिंदु असून युवती मुसलमान होती. दोघांच्या प्रेमात धर्माची उंच भिंत अडसर ठरल्याने दोघांनी हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
गळफास घेण्यापूर्वी प्रियकराने प्रेयसीच्या कपाळावर कुंकू लावून तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. नंतर ओढणीने दोघांनी गळफास घेऊन जीवनप्रवास संपवला.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील भौराखुर्द गावात सोमवारी (4 मे) सकाळी दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. रजनीश (21) आणि इमराना (18) असे प्रेमी युगुलाचे नाव आहे. रजनीश आणि इमरानाचे एकमेकांवर निखळ प्रेम होते. दोघांची विवाह करण्याची इच्छा होती. परंतु, त्यांच्या विवाहाला नातेवाइकांनी विरोध केला होता. दोघे रविवारी (3 मे) रात्री घरून पळून आले. सोमवारी सकाळी गावाबाहेरील एका झाडाला दोघांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून चौकशी सुरु केली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित छायाचित्रे...