आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boyfriend Injured In Acid Attack By Girlfriend At Uttarpradesh

गर्लफ्रेण्डने केला बॉयफ्रेण्डवर अॅसिड हल्ला; वाढदिवसाच्या बहाण्याने बोलावले होते घरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिजनौर- उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात एका प्रेयसीने प्रियकरावर अॅसिड हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गजरौला शिव गावात ही घटना घडली. प्रियकर सूरजने प्रेयसी आफरीन हिला लग्नास नकार देऊन दुसर्‍याच मुलीसोबत लग्न केले होते. यामुळे आफरीन प्रचंड संतापली होती. सूरजला तिने वाढदिवसाच्या बहाण्‍याने घरी बोलावून त्याच्यावर अॅसिड हल्ला केला.

या हल्ल्यात सूरज 50 टक्के भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपी प्रेयसीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेली माहिती अशी, की सूरज व आफरीन या दोघांने एकमेकांवर प्रेम होते. मात्र, सूरजच्या आई-वडिलांनी आफरीनला स्विकारण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे सूरजने आफरीनला लग्नास नकार दिला होता. आई-वडीलांनी पाहिलेल्या दुसर्‍या मुलीसोबत सूरजचे लग्न ठरले होते. त्यामुळे आफरीन प्रचंड संतापली होती. तिने सूरजला वाढदिवसाच्या बहाण्‍याने आपल्या घरी बोलावले व संधी पाहून त्याच्यावर अॅसिड फेकले. सूरजसोबत यावेळी त्याचा मित्र देखील होता.