आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निभाने बॉयफ्रेंडला सांगितले, तुझ्या शरीरातून वास येतोय, दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा (बिहार)- लग्न झालेल्या आणि एका मुलाची आई असलेल्या महिलेचे भोला यादव नावाच्या तरुणावर प्रेम होते. काही दिवसांपूर्वी महिलेने पतीला घटस्फोट दिला. त्यानंतर महिला आणि भोला दोघे लिव-इनमध्ये राहत होते. एकदा महिलेने भोलाकडे तक्रार केली, की तुझ्या शरीरातून खुपच दुर्गंधी येते. मला सहन होत नाही. त्यावर भोला एवढा चिडला, की त्याने दुसऱ्या दिवशी महिलेची गळा दाबून हत्या केली.
तीन दिवसांनी घरात सापडला मृतदेह
- पाटण्याचे पोलिस आयुक्त मनू महाराज यांनी सांगितले, की मृतदेह सापडल्यानंतर केवळ 8 तासांत आम्ही तपास पूर्ण केला. भोलाने गुन्हा कबुल केला आहे.
- विशुनपूर परिसरातील एका घरात निभा नावाची महिला राहत होती. तिला एक लहान मुलगा होता. तिचा बॉयफ्रेंड तिच्याच सोबत राहायचा.
- काही दिवसांपूर्नी निभाचे घर बंद होते. तिच्या घरातून प्रचंड दुर्गंधी येत होती. शेजाऱ्यांनी घराचे दार तोडून बघितले.
- बेडवर निभाचा मृतदेह पडला होता. तिची जीभ बाहेर आली होती. सिलिंग फॅन सुरु होता. म्युझिक प्लेअरही सुरु होता.
- हत्या करण्यापूर्वी निभा आणि तिचा बॉयफ्रेंड गाणी ऐकत होते. त्यानंतर दोघांमध्ये वादावादी झाली असावी, असा पोलिसांना संशय आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा.... आधी बेदम मारले... नंतर केली हत्या.... वाचा काय सांगितले भोलाने...
बातम्या आणखी आहेत...