आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेयसीला आवडला दुसरा तरूण, 3 वर्षांच्या प्रेमाचा झाला असा अंत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाराबंकी (उत्तर प्रदेश)- येथे शनिवारी रात्री प्रेम प्रकरणातून एका तरूणाची गोळी घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. प्रेयसीच्या नातेवाईकांनी प्रियकराला बोलवून घेतले आणि गोळ्या झाडून त्याची हत्या केली. यामुळे तरूणाचा जाग्यावरच मृत्यू झाला, असे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी अवैध पिस्तूल देखीस जप्त केले आहे.


3 वर्षापासून सुरू होते प्रेमसंबंध...
- घटना काशीराम कॉलनीमागे वसलेल्या वस्तीतील आहे. येथे शोएब प्रॉपर्टी डीलिंगचे काम करत होता. 3 वर्षांपासून त्याचे नमिता सिंह (नाव बदलले आहे) सोबत प्रेमसंबंध सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये तिसऱ्या तरूणावरून वाद सुरू होता असे सांगण्यात येत आहे. प्रेयसीचे दुसऱ्या तरूणासोबत संबंध असल्याने शोएबशी युवतीचा वाद सरू होता.


- या दरम्यान मुलीच्या नातेवाईकांनी शोएबला फोन करून घरी बोलवून घेतले. दोन्ही घरांमधील अंतर अंदाजे 100 मीटर आहे. शोएब आपला मित्र नितेश श्रीवास्तवला सोबत घेत युवतीच्या घरी पोहोचला होता.


डोक्यात झाडली होती गोळी...
- मित्राने सांगितले की, शोएब घरात गेला तेव्हा मी घराबाहेर गाडीत बसलेलो होतो. काही वेळानंतर गोळी झाडल्याचा आवाज आला. मी पळत आत गेलो तेव्हा शोएब रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. रुग्नालयात घेऊन जाण्याआधीच त्याने दम तोडला.
- तरूणाच्या मामाने सांगितले की, तरूणीच्या घरच्यांनी शोएबला घरी बोलवून घेतले आणि गोळी झाडून त्याची हत्या केली. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांचे प्रेमसंबंध सुरू होते.
- माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. तसेच घटनास्थळावरून पोलिासांनी एक पिस्तूल जब्त केले आहे.

 

पुढील स्लाइडर पाहा संबंधित फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...