आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 वर्षांच्या प्रेयसीने घातली लग्नाची गळ, प्रियकराने हत्या करुन शेतात गाडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर (पंजाब) - जालंधर पोलिसांनी 11 दिवसानंतर एका खूनाचा गुंता सोडवला आहे. येथील कोहाला गावातील राजबीर उर्फ राजाने 17 वर्षांच्या संदीपकौरचा खून केला होता. राजाचा संशय होता की संदीपकौरचे अफेअर सुरु आहे. संधी मिळताच त्याने संदीपकौरच्या चेहऱ्यावर विट मारुन तिचा खून केला. मृतदेह घराजवळील शेतात पुरला आणि घरी जाऊन झोपून राहिला. ही घटना 22 डिसेंबरची आहे. 11 दिवसानंतर पोलिसांनी मोबाइल कॉल लोकेशनवरुन हत्येचा गुंता सोडवला आणि मृतदेह ताब्यात घेतला. 
 
दोन वर्षांपासून सुरु होते अफेअर 
- 22 वर्षांपासून राजा आणि 17 वर्षांची संदीप कौर यांच्यात अफेअर सुरु होते.
- 20 डिसेंबर रोजी त्याला शंका आली की संदीपच्या आयुष्यात दुसरा कोणीतरी आला आहे. 
- जेव्हा त्याने संदीपकडे याची विचारणा केली तेव्ही तिने लग्नासाठी दबाव टाकला. त्याने लग्नाला नकार दिला तर विष प्राशन करुन आत्महत्येची धमकी दिली.
- यामुळे संतप्त झालेला प्रियकर राजाने संदीपचा खून केला. सोमवारी दुपारी पोलिस राजाला गावात घेऊन आले.
- राजा नायब तहसिलदारांसमक्ष क्राइम सीन आणि संदीपला ज्या ठिकाणी गाडले तिथे पोलिसांना घेऊन गेला. 
- पोलिसांनी राजाने सांगितल्यानंतर त्या ठिकाणी खोदकाम करुन मृतदेह बाहेर काढला.
 
पोलिसांच्या तावडीत सापडल्याबरोबर गुन्हा कबूल 
- संदीप कौरच्या आईने लांबडा पोलिस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली होती. 
- पोलिस अधिकारी सुखपालसिंग रंधावा यांनी तपास करुन गावातील एका युवकाला ताब्यात घेतले. त्याने राजाबद्दल माहिती दिली.
- राजाच्या कॉल डिटेलमध्ये समोर आले की 22 डिसेंबरच्या दुपारी तो संदीपसोबत बोलत होता.
- राजाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने थोड्या वेळातच गुन्हा कबूल केला.
 
पहिले गळा आवळला, नंतर तोंडावर विट मारली 
- राजबिरसिंगने पोलिसांना सांगितले की तो ट्यूबवेल मॅकॅनिक आहे. 22 डिसेंबरच्या दुपारी संदीपकौरने मिस्ड कॉल दिला होता. 
- फोन केला तर संदीपने उशिरा रात्री हवेलीजवळ भेटायला बोलवले. त्याने संदीपला विचारले तू मला धोका का दिला? 
- संदीप हे मान्य करायला तयार नव्हती. याचा समज मात्र पक्का होता. त्याला वाटत होते संदीप खोटे बोलत आहे.
- संदीप सज्ञान होण्यासाठी 2 महिने बाकी होते. राजा तिचे ऐकायला तयार नाही तेव्हा तिने भिंतीवर डोके मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.
- राग आणि घाबरून राजाने तिचा गळा आवळला. संदीप जमीनीवर कोसळली तेव्हा त्याने विट घेऊन तिच्या तोंडावर वार केले. 
- संदीपच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह त्याने तिथेच झुडपात लपवून ठेवला. नंतर मृतदेह गावात घेऊन गेला आणि एका खड्ड्यात गाडला. मध्यरात्री घरी जाऊन झोपला. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आरोपीने दाखवले घटना स्थळ.. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...