आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवर लिहिले- जिंदगी रही तो मिलेंगे दोबारा; मग प्रेयसीच्या दारातच घेतले जाळून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणाने प्रेयसीच्या दारातच तरुणाने स्वत:ला जाळून घेतले. - Divya Marathi
तरुणाने प्रेयसीच्या दारातच तरुणाने स्वत:ला जाळून घेतले.
पूर्णिया - बिहारच्या पूर्णिया शहरात बीबीएम शाळेजवळ गुरुवारी दुपारी मोठी खळबळ उडाली. गौरव घोष नावाच्या एका तरुणाने स्वत:ला जिवंत जाळून घेतले. गंभीर अवस्थेत पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याला भागलपूरच्या दवाखान्यात रेफर केले, परंतु वाटेतच तरुणाचा मृत्यू झाला. मृत्यूच्या एक दिवस आधी तरुणाने आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले होते- "बाय-बाय एफबी, व्हॉट्सअॅप! जिंदगी रही तो मिलेंगे दोबारा।"

प्रेयसीच्या घराबाहेर घेतले जाळून...
- ही घटना गुरुवारी दुपारी 3 वाजता घडली. प्रेयसीला भेटायला गौरव तिच्या घरी गेला. गेटबाहेर उभा राहून गौरव त्याच्या प्रेयसीला मोठमोठ्याने आवाज देत होता. तरुणी बाहेर आली नाही म्हणून त्याने स्वत:च्या अंगावर पेट्रोलचा डबा रिकामा केला आणि आग लावून घेतली.
- पेट्रोलची आग वेगाने पसरली आणि काही सेकंदांतच तरुणाचा पूर्ण शरीर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तो जोरजोरात किंचाळू लागला होता.
- घटनास्थळी उपस्थित लोक तमाशा पाहत होते. काही लोकांनी व्हिडिओ बनवला आणि फोटोही काढले. काही सेकंदांतच तो 80 टक्के जळाला. 
- एएसआय रतन कुमार म्हणाले, तरुणाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित घटनेचे आणखी फोटोज....
बातम्या आणखी आहेत...