आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री प्रियकराच्या रूमवर होती प्रेयसी; मुलीच्या घरच्यांनी आवाज दिला, अन् मुलाने केले असे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी मुलगा दिलीप... - Divya Marathi
आरोपी मुलगा दिलीप...
दौसा (राजस्थान) - येथे एका प्रियकराने आपल्या अल्पवयीन प्रेयसीवर चाकूने 11 वेळा वार केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. प्रेयसीला ठार मारल्यानंतर त्याने फासावर लटकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐनवेळी रुगणालयात दाखल करून त्याला वाचवण्यात आले. राजस्थान पोलिस याबाबत सविस्तर तपास करत आहेत. 
 
 
- याबाबत सविस्तर वृत्त असे, की राजस्थानच्या दौसा येथे एक अल्पवयीन जोडपे खोलीत बंद होते. त्याचवेळी मुलीच्या घरच्यांनी खिडकीतून आपल्या मुलीला पाहिले. 
- मुलीच्या घरचे दार वाजवत असल्याचे पाहून तो प्रचंड घाबरला. यात त्याला काहीही सुचले नाही. घाबरलेल्या मुलाने आपल्या प्रेयसीवर चाकूने तब्बल 11 वार केले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मुलगा स्वतः देखील फासावर लटकला. मात्र, वेळीच रुगणालयात दाखल करून त्याचा जीव वाचवण्यात आला. 
 
 
अल्पवयीन मुलीला पळवून आणले होते
- वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप मीणा असे त्या युवकाचे नाव असून तो दौसा येथे भाड्याने रूम घेऊन राहत होता. तो पॉलिटेक्निक कॉलेजचा विद्यार्थी आहे. 
- दिलीपने आपल्या गावात 10 वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला पळवून रूमवर आणले होते. 
- मुलीच्या घरच्यांकडे दिलीपच्या खोलीचा पत्ता होता. दौसा येथे आलेल्या पालकांनी दिलीपच्या खिडकीतून आपल्या मुलीला पाहिले. त्यांनी दारावर जाऊन दिलीप आणि आपल्या मुलीला हाका मारल्या. तेव्हा दिलीपला घाम सुटला होता. 
- याचवेळी दिलीपने मुलीला ठार मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. दिलीप सध्या रुगणालयात असून याबाबत सविस्तर चौकशी सुरू आहे.