आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boys And Girls Cant Seat Together, College Administrations Orders

मुला-मुलींनी एकत्र बसू नये, कॉलेजचे फर्मान; विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांची हकालपट्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो. - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो.
कोझिकोड - केरळच्या कोझिकोडस्थित फारुक महाविद्यालयाच्या नव्या फर्मानामुळे वादंग उठले आहेत. महाविद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थिनींना वेगवेगळे बसवण्याचे आदेश व्यवस्थापनाने दिले आहेत. कॉलेज कँटीनमध्येही सोबत बसण्याची परवानगी दिलेली नाही. आदेशाचे पालन न करणाऱ्या ९ विद्यार्थ्यांची हकालपट्टी केली आहे.
विद्यार्थ्यांनी माफीनाम्यासोबत आपल्या आई-वडिलांनाही आणावे, असे आदेश महाविद्यालयाने दिले आहेत. माफी मागितल्यानंतर ५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. हा निर्णय लैंगिक विषमता पसरवणारा असल्याचे मत बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी डिनू के. याने व्यक्त केले. यामुळे त्याला अनिश्चित काळासाठी महाविद्यालयातून काढण्यात आले. मी काही गुन्हा केलेला नाही, ज्यामुळे मी माफी मागावी, असे डिनू के. याने म्हटले आहे. एका विद्यार्थिनीने सांगितले की, महाविद्यालयाच्या कँटीनमध्येही मुला-मुलींना वेगवेगळे बसवण्याचे आदेश व्यवस्थापनाकडून देण्यात आले.