उद्यपूर (राजस्थान) - येथे देवदर्शनासाठी आलेल्या तरुणांना एका फार्म हाऊसवर तीन मुलींसह रेव्ह पार्टी करताना पकडण्यात आले आहे. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा दोन रुममध्ये रेव्ह पार्टी सुरु होती. अटक करण्यात आलेले 8ही तरुण गुजरातचे आहे, तर मुली पुणे आणि मुंबईच्या आहेत. 25 जण फार्म हाऊसवरुन फरार झाले.
तरुणी पुणे-मुंबईच्या, गाडी गुजरात पासिंगची
- गुजरात-राजस्थान सीमेवरील हॉटेलमध्ये जुगार आणि रेव्ह पार्टी होण्याच्या घटना वाढल्या आहेत.
- बुधवारी रात्री झालेल्या छापेमारीबद्दल डीवायएसपी माधुरी वर्मा यांनी सांगितले, की घनदाट जंगलामध्ये असलेल्या फार्म हाऊसवर रेव्ह पार्टी सुरु होती. पार्टीमध्ये दारू आणि नशेचे पदार्थ होते.
- फार्म हाऊसवर पकडण्यात आलेल्या तरुणी या पुणे आणि मुंबईच्या आहे, तर तरुण हे गुजरातचे आहे. त्यांची गाडी गुजरात पासिंगची आहे.
अटक केलेल्याची नावे
- अटक करण्यात आलेल्यांमध्ये संजय नरसिंह भाई पटेल, विजय कांतीलाल पटेल, प्रफुल्ल शांतीलाल पटेल, राजेश देवराज पटेल, निलेश रामजी पटेल, रमेश पुरुषोत्तम पटेल, राजेंद्र वत्सलभाई पटेल, प्रवीण अमरसिंह पटेल सर्व गुजरातमधील राजकोट येथील रहिवासी आहेत.
- पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम आणि मोबाइल जप्त केले. रात्री तीन वाजतापर्यंत कारवाई सुरु होती.
पोलिस येताच 5 फुटांच्या भिंतीवरुन मारल्या उड्या
- कुकडेश्वर महादेव जंगलात असलेल्या फार्म हाऊसवर रेव्ह पार्टी सुरु होती.
- रात्री उशिरा पोलिस पथकाने धाड टाकल्यानंतर युवक-युवतींची तारांबळ उडाली. मार्ग सापडेल तिकडे सर्व पळत सुटले.
- युवक - युवतींनी फार्म हाऊसच्या 5 फुटांची भिंतीवरुन उड्या मारुन पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला मात्र 25 जण पळून जाण्यात यशस्वी झाले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अटक करण्यात आलेल्या आरोपींचे फोटो..