पानीपत - एका विवाहित युवकाने
आपल्या प्रेयसीच्या डोक्यात विटेने वार केला. नंतर गावठी कट्टयातून तिच्या छातीत गोळी झाडली. युवतीची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आरोपीने आपल्या मुलीची अश्लील क्लिप तयार करून तो तिला ब्लॅकमेल करत होता, असा आरोप युवतीच्या आईने केला आहे. ही घटना जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेत (जेबीटी) बुधवार घडली. विपीन असे आरोपीचे नाव आहे.
नेमके काय झाले...
- आरोपी विपीन हा करनाल जिल्ह्यातील कोहंड येथील रहिवाशी आहे. पीडित युवतीसोबत त्याचे प्रेम संबंध होते.
- पीडित तरुणी ही सोनीपतच्या गोहाना येथील रहिवाशी असून, ती पानीपत येथील जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेमध्ये डिप्लोमा करत आहे.
- बुधवारी ती प्रॅक्टिकल देण्यासाठी आली होती. दरम्यान, त्या ठिकाणी आरोपी विपीन अगोदरपासूनच उपस्थित होता.
- तो त्या युवतीला कॉलेजच्या छतावर घेऊन गेला. त्या ठिकाणी त्यांच्यात वाद झाला. त्या नंतर विपीनने सुरुवातीला त्याच्या डोक्यात विटेने घाव घातला. नंतर गोळी झाडून तो फरार झाला.
काय म्हणाला आरोपी ?
- विपीनने पोलिसांना सांगितले, सहा महिन्यांपूर्वी माझे लग्न झाले. पण, मी माझ्या पत्नीला घटस्फोट द्यावा, यासाठी ती दबाव टाकत होती.
- एवढेच नाही तर तिने या बाबत माझ्या नातेवाईकांनाही सांगितले होते. त्यामुळे लग्न तुटण्याची भीती निर्माण झाली होती.
पीडित मुलीची आई काय म्हणाली...
- विपीनने लग्नाचे अमीष दाखवून आपल्या मुलीला प्रेम जाळ्यात ओढले, असा आरोप पीडित मुलीच्या आईने केला.
- शिवाय त्याने त्याच्या मोबाइलमध्ये आपल्या मुलीची अश्लील चित्रफीत बनवली.
- यातून तो तिला ब्लॅकमेल करत होता.
- शिवाय त्याने या क्लिपच्या आधारे तिचे ठरलेले लग्नही मोडले, असा आरोप पीडित मुलीच्या आईने केला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो.....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)