आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंघोळ करणाऱ्या महिलांवर वाईट नजरा, सुरु होते फोटो शूट; पोलिसांची उडवाउडवी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - येथे सध्या बाबा रामदेव यांचा मेळा लागला आहे. त्यासाठी अनेक गाव-खेड्यातून, शहरातून महिला, पुरुषांचे जत्थे जोधपूरमध्ये दाखल झाले आहेत. येथील मंडोर गार्डनमध्ये हे लोक विश्राम करतात. त्यांच्यासोबत आलेल्या महिला जवळच असेलल्या पाण्यामध्ये स्नान आदी उरकत आहेत. उघड्यावर अंघोळ करत असलेल्या महिलांना काही तरुण चोरून लपून पाहातात, तर काहींनी त्यांचे मोबाइलमध्ये व्हिडिओ देखील शुट केले.
याची तक्रार मिळाल्यानंतर भास्करच्या डीबी स्टारच्या टीमने तिथे पाहाणी केली तर, झाडांवर बसून, किंवा झुडपांमध्ये दडून तरुण मुले महिलांकेड वाईट नजरेने पाहात होते, काहींच्या हाता मोबाइल होते.
- डीबीस्टार टीमने पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी आले.
- त्यांनी मुलांना तेथून हुसकावून लावले. मात्र त्यांच्याकडील व्हिडिओ क्लिप काही डिलिट केल्या नाही.
- याबद्दल त्यांना विचारल्यावर पोलिसांचे उत्तर होते, अनेकदा व्हिडिओ डिलिट केले आहेत. गेल्या पाच-सहा दिवसांपासून हे सुरु आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

अधिकारी म्हणाले कोणाची तक्रारच नाही
- पोलिस अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली तेव्हा त्यांचे उत्तर होते, अशी कोणतीही तक्रार आलेली नाही.
- तक्रार आली तर मंडोर गार्डन येथे पोलिस तैनात केले जातील.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, लोकांच्या वाईट नजरा आणि महिलांची कुचंबना..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...