आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शर्यत लावून तरुणांनी महिलेला केले विवस्त्र, 8000 रुपयांसाठी केले हे कृत्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगराओं/लुधियाना- पतीसोबत फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेला रोड रोमिओंनी भरचौकात विवस्त्र केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जगराओंच्या कमल चौकात ही घटना घडली.

10 रोड रोमिओंनी आपापसात 8 हजार रुपयांची शर्यत लावून महिलेचे कपडे उतरवले. तिला पतीसमोर विवस्त्र केले. एवढा निर्लज्जपणा करून ते थांबले नाहीत तर नंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवत शिट्या मारल्या. पीडिता आणि तिच्या पतीने विरोध केला असता भामट्यांनी तेथून पळ काढला.
पीडितेने पोलिसांना सांगितली आपबिती...
- महिलेच्या पतीने त्याच्या म‍ित्रांंना बोलवून रोड रोमिओंंचा पाठलाग केला. एका पकडले. त्याची चांंगली धुलाई करून पोलिसांच्या हवाली दिले.
- बदनामी होईल, या भीतीने पीडित महिलेने पोलिसांत कोणतीही तक्रार केली नाही. आरोपींंनी पुन्हा पीडितेला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केल्यानंतर मात्र, तिने पोलिसांना आपबिती सांगितली.
- पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीची दखल घेऊन एका आरोपीला अटक केले आहे.

पोलिसांनी सुुरु केला चौकशी...
-एसएचओ राजेश शर्मा यांनी सांगितले की, पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.
- पीडितेचा जबाब नोंंदवण्यात आला असून आरोपी रवी कुमारला पोलिसांनी अटक केली आहे. त्याची पोलिस कसून चौकशी करत आहेत.

चुकीला माफी नाही- एसएसपी
- एसएसपी उपिन्द्रजीत सिंह घुम्मन यांनी सांगितले की, चुकीला माफी नाही. आरोपींंचा शोध घेतला जात आहे.
- स्थानिक भाजप नेत्यांनी आरोपींंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पुढील स्लाइड्सवरील इन्फोंग्राफीकमध्ये वाचा, पीडितेने सांंगितली आपबिती...
बातम्या आणखी आहेत...