आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे गरजूंसाठी सजवली जाते ब्रह्मभोज थाळी, 19 वर्षांची अखंड परंपरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना- येथील गुरु अर्जुन देव नगरात दीन, गरीब लोकांसाठी दररोज ब्रह्मभोज थाळी सजवली जाते. मागील 19 वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरु आहे. काही वर्षांपूर्वी ब्रह्मभोजसाठी फक्त एक रुपया शुल्क आकारले जात होते. आता मात्र दीन, गरजूंना मोफत भोजन दिले जाते.
ड्रीम अॅण्ड ब्यूटी चॅरिटेबल ट्रस्टद्वारा कर्मा हॉस्पिटल कॅम्पसमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. रविवार वगळता दररोज दुपारी 12 ते 2 वाजेच्या काळात कॅन्टीनमध्ये गरीबांना मोफत भोजन दिले जाते.

ब्राह्मण भोजनानंतर मिळते जेवण...
कॅन्टीनमध्ये साफ-सफाईकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जाते. भोजन करण्यासाठी आलेल्या लोकांना सगळ्यात आधी हाताच्या बोटांची नखे काढावी लागतात. उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले जाते. ब्राह्मण भोजनात 70 लोकांना एकत्र बसवून जेवण दिले जाते. येथे दररोज जवळपास 500 लोक शुधा शांती करतात.

1500 मुलांना पाठवले जाते ब्रह्म भोज...
दोराहा येथील हॅवेनली पॅलेसच्या किचनमधून दररोज शहरातील चार शाळांमधील 1500 पेक्षा जास्त मुलांना ब्रह्मभोज पाठवले जाते. ड्रीम अॅण्‍ड ब्यूटी चॅरिटेबल ट्रस्टने बीआरएस नगरातील इकजोत स्कूल, हंबडा रोडवरील गौशाला स्कूल आणि अन्य दोन शाळा दत्तक घेतल्या आहेत. मीड-डे मीलच्या रुपात या शाळांमध्ये ब्रह्मभोज दिले जाते.

'अनेक वर्षांपासून लुधियाना येथे राहात आहे. त्यामुळे येथील गरीब लोकांना खूप जवळून पाहिले आहे. गरीबांची शुधा शांती करणे, हाच माझा प्रामाणिक उद्देश आहे. गरीबांची सेवा केल्याने मला समाधान मिळते.'
- अनिल कुमार मोंगा, सीईओ, विक्ट्री इंटरनॅशनल

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, ब्रह्मभोजणाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...