(फोटो: ब्रह्मभोज वाढताना ड्रीम अॅण्ड ब्युटी चॅरिटेबल ट्रस्टचे सेवक)
लुधियाना- गुरु अर्जुन देव नगरात दररोज गरीब लोकांसाठी ब्रह्मभोज थाळी सजवली जाते. ही परंपरा मागील 19 वर्षांपासून अखंड सुरु आहे. काही वर्षांपूर्वी ब्रह्मभोजसाठी फक्त एक रुपया शुल्क आकारले जात होते. परंतु आता तर अगदी मोफत जेवण दिले जाते.
ड्रीम अॅण्ड ब्यूटी चॅरिटेबल ट्रस्टद्वारा कर्मा हॉस्पिटल कॅम्पसमध्ये ही कॅन्टीन चालवली जाते. रविवारसोडून दररोज दुपारी 12 ते 2 वाजेच्या काळात ही कॅन्टीन सुरु असते.
ब्राह्मण भोजनानंतर मिळते जेवण...
कॅन्टीनमध्ये साफ-सफाईकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जाते. भोजन करण्यासाठी आलेल्या लोकांना सगळ्यात आधी हाताच्या बोटांची नखे काढावी लागतात. हात स्वच्छ धुतल्यानंतर सगळ्याना हायजीनशी संबंधित माहिती दिली जाते. आधी ब्राह्मण भोजन आणि नंतर 70 लोकांना एकत्र बसवून भोजन दिले जाते. येथे दररोज जवळपास 500 लोक शुधा शांती करतात.
1500 मुलांना पाठवले जाते ब्रह्म भोज...
दोराहा येथील हॅवेनली पॅलेसच्या किचेनमधून दररोज शहरातील चार शाळांमधील 1500 पेक्षा जास्त मुलांना ब्रह्मभोज पाठवले जाते. ड्रीम अॅण्ड ब्यूटी चॅरिटेबल ट्रस्टने बीआरएस नगरातील इकजोत स्कूल, हंबडा रोडवरील गौशाला स्कूल आणि अन्य दोन शाळा दत्तक घेतल्या आहेत. मीड-डे मीलच्या रुपात या शाळांमध्ये ब्रह्मभोज दिले जाते.
'अनेक वर्षांपासून लुधियाना येथे राहात आहे. त्यामुळे येथील गरीब लोकांना खूप जवळून पाहिले आहे. गरीबांची शुधा शांती करणे, हाच माझा प्रामाणिक उद्देश आहे. गरीबांची सेवा केल्याने मला समाधान मिळते.'
- अनिल कुमार मोंगा, सीईओ, विक्ट्री इंटरनॅशनल
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, ब्रह्मभोज करताना लोकांचे छायाचित्रे..