आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणबुडीवरील ब्राम्होस क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी; 290 किमीवरील लक्ष्य भेदले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशाखापट्टणम- पाणबुडीवरून सोडता येणार्‍या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्राम्होसची बुधवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. बंगालच्या उपसागरात ही चाचणी घेण्यात आली. अशा प्रकारचे सार्मथ्य प्राप्त करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे.

ब्राम्होस परियोजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवतनू पिल्लई यांनी सांगितले की, हे परीक्षण पूर्णपणे यशस्वी ठरले. या क्षेपणास्त्राने चाचणीदरम्यान 290 किलोमीटर दूरवर निर्धारित करण्यात आलेले लक्ष्य यशस्वीरीत्या भेदले. ध्वनीच्या वेगाने जाणारी ब्राम्होसची दोन क्षेपणास्त्रे याआधीच तयार केली गेली आहेत. जमिनीवरून हवेत तसेच लढाऊ युद्धनौकेवरून हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित करता येते. ही दोन्ही क्षेपणास्त्रे भारतीय लष्कर व वायुदलाकडे सोपवण्यात आली आहेत. त्याचबरोबर वायुदलाच्या विमानातून सोडता येणारे क्षेपणास्त्रही तयार आहे. पिल्लई यांनी दिलेल्या माहितीनुसार या यशस्वी चाचणीनंतर आता ब्राम्होस क्षेपणास्त्र स्कॉर्पियन पाणबुडीवर तैनात करता येऊ शकेल. ब्राम्होसच्या तैनातीमुळे ही पाणबुडी जगात सर्वात शक्तिशाली ठरेल. संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांनी ब्राम्होसच्या यशस्वी चाचणीनंतर सर्व शास्त्रज्ञ तसेच नौदल सदस्यांचे अभिनंदन केले आहे.

केप केनरव्हेल- अमेरिका आता जगभरातील क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणावर अंतराळातून वॉच ठेवणार आहे. यासाठी अमेरिकेने अतिशय प्रगत अशा इन्फ्रारेड उपग्रह जीईओ -2चे बुधवारी यशस्वी प्रक्षेपण केले. फ्लोरिडा येथील केप केनरव्हेल हवाई तळावरून याचे प्रक्षेपण करण्यात आले. जीईओ-2 हा उपग्रह गेल्या 40 वर्षांपासून काम करत असलेल्या डिफेन्स सपोर्ट प्रोग्राम उपग्रहाची जागा घेणार आहे.