आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्‍तराखंड: मुक्या प्राण्याला वाचवण्यासाठी तरुणांनी लावली जीवाची बाजी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुद्रप्रयाग- निसर्गाच्या प्रकोपामुळे हाहाकार उडालेल्या उत्‍तराखंडमधील परिस्थिती दिवसेंदिवस जटील होत आहे. महाप्रलयाला 12 दिवस उलटले असून अजूनही बचाव कार्य सुरुच आहे. उद्या (शनिवारी) बचाव कार्य पूर्ण होणार असल्याचे लष्काराच्या सूत्रांनी सांगितले आहे.

दुसरीकडे, रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उफनती नदीला पूर आला असून सोनप्रयाग येथे काही तरुणांनी एका मुक्या प्राण्याला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावल्याचे निदर्शनास आले. सोनप्रयागमधील काही रहिवासी तरुण नदीच्या काठावर सरकारी मदतीची वाट पाहत बसले होते. तेवढ्यात नदीच्या पूरात त्यांना एक खेचर वाहून जाताना दिसले. तरुणांनी कोणताही विचार न करता वि‍क्रम राणा या तरुणाच्या नेतृत्त्वाखाली पटापट नदीपात्रात उड्या घेतल्या. अथक परिश्रमातून त्यांनी खेचराचे प्राण वाचवले. (पाहा फोटोज्)

पुढील स्लाइड्‍समध्ये वाचा... 'केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे पोहोचले डेहराडूनमध्ये'