Home »National »Other State» Brazilian Lady Reached To Live With Indian Boy Friend At Haryana

पतीला न सांगता ब्राझीलहून आली प्रेयसी, अशी पडली होती या तरुणाच्या प्रेमात

दिव्य मराठी वेब टीम | Oct 14, 2017, 14:03 PM IST

यमुनानगर (हरियाणा)-ब्राझीलची राहणारी मारथा आणि यमुनानगर येथील अनंत यांची दोन वर्षांपूर्वी फेसबुकवर ओळख झाली. अनंतने फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली आणि मारथाने ती अॅक्सेप्ट केली. हळू-हळू दोघांमधील मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर मारथाने आपल्या प्रियकराकडे भारतात येण्याचा निर्णय घेतला. ती विवाहित असून दोन मुलांची आई आहे. नवऱ्याला न सांगता टुरिस्ट विजाद्वारे ब्राझीलहून दिल्लीत प्रियकराकडे पोहोचली.
दिल्लीत लोकेशन मिळाली त्यामुळे पतीने मिसिंगची तक्रार दाखल केली...
- मारथा घरी पोहोचली नाही, त्यामुळे पतीने तिचा खुप शोध घेतला.
- ब्राझील पोलीसांनी शोध घेतला तेव्हा मारथा टूरिस्ट वीजा घेऊन भारतात आल्याचे समजले. ब्राझील अॅम्बॅसीने तीची लोकेशन तपासली तेव्हा ती दिल्लीत असल्याचे आढळले.
- त्यानंतर दिल्ली पोलीसांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती सढौरमध्ये असल्याचे समजले.
- गुरूवारी रात्री दिल्ली पोलीस आणि ब्राझील अॅम्बॅसीचे अधिकाऱ्यांनी सढौर येथे पोहोचून मारथाची भेट घेतली.
- सढौर पोलीसात मारथाने जबाब दिला की, ती स्वत:च्या मर्जीने येथे आली आहे.
- त्यानंतर दिल्ली पोलीस आणि ब्राझील दूतावासाचे अधिकारी मारथाला आपल्यासोबत घेऊन गेले.

14 सप्टेंबरला आली होती भारतात....
- मारथा टूरिस्ट वीजावर भारतात आली होती. 14 सप्टेंबरला दिल्लीत पोहोचली होती. दिल्ली विमानतळावर अनंत तिला घेण्यासाठी आला होता.
- अनंतने सांगितले की, यानंतर तो मारथाला आपल्या घरी घेऊन गेला. अनंतच्या प्रेमापुढे आणि त्याच्या खुशीसाठी कुटुंबानेही हार मानली.
पुढील स्लाइडवर वाचा अनंत आणि माथराच्या प्रेमाची गोष्ट...

Next Article

Recommended