आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Breakable Instruments Kept Secret Meeting And Kashmir Police, Yasin Malik Gilani's Possession Outdoors

फुटीरवाद्यांची गुप्त बैठक काश्मीर पोलिसांनी रोखली, यासीन मलिक गिलानीच्या घराबाहेर ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर : पोलिसांनी सोमवारी जेकेएलएफचा प्रमुख यासीन मलिक याला फुटीरवादी नेता सईद अली शाह गिलानीच्या घराबाहेरच रोखले. गिलानीच्या घरी गुप्त बैठक ठेवण्यात आली होती. त्यासाठी फुटीरवादी नेत्यांना बोलावण्यात आले होते, अशी माहिती मिळाली होती. पोलिसांनी कोणालाही आत जाऊ दिले नाही. त्यामुळे बैठक होऊ शकली नाही. नेत्यांच्या समर्थकांनी खूप गोंधळ घातला, पण पोलिसांनी तो हाणून पाडला. शांत झालेल्या काश्मीरमध्ये पुन्हा बंद करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती, असे कळते.

गिलानीने आपल्या घरीच गुप्त बैठक ठेवली होती, तीत काश्मीरमधील स्थितीवर चर्चा होणार आहे, असे समजले होते. आगामी काळात कसे काम करायचे याची नवी योजना बैठकीत आखण्यात येत होती. पण ही माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी गिलानीच्या हैदरपोरा भागातील घराबाहेर सुरक्षा वाढवली. मलिक आणि त्याचे समर्थक गिलानीच्या घरी पोहोचताच त्यांना रोखण्यात आले. समर्थकांनी गोंधळ घालताच पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले. अशाच प्रकारे इतर नेत्यांनाही आत जाऊ दिले गेले नाही.
काश्मीरमध्ये सध्या स्थिती सुरळीत झाली आहे, पण फुटीरवादी सतत बंदला प्रोत्साहन देत आहेत. आगामी काळात शांतताभंग होऊ नये म्हणून पोलिसांनी हे पाऊल उचलले. बुरहान वानी चकमकीत मारला गेल्यानंतर काश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचारात ७० पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे, तर हजारो नागरिक जखमी झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...