आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Breakfast In One Rupaya And Dinner In Eight Rupees In Tamilnadu Amma Canteen

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तामिळनाडूतील 'अम्मा कँटीन'मध्ये मिळतो एक रुपयात नाष्टा, आठ रुपयांत जेवण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- किलपाक परिसर. अम्मा-उनावगम. अम्मा म्हणजे जयललिता. उनावगमचा अर्थ कँटीन. सकाळी साडेसहाची वेळ. बंद दरवाजातून लोक आतील भाग न्याहाळतात. दरवाजे सात वाजता उघडताच तत्काळ काउंटरवर कुपन घेण्यासाठी रांग. ही नाष्ट्याची वेळ आहे. दहा वाजेपर्यंत नाष्ट्यामध्ये इडली व पोंगल. केवळ एक रुपयात. दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत जेवण. तीन रुपयांत दही-भात आणि पाच रुपयांत सांबारसोबत तांदूळ. दोन्ही खाल्ल्यास पोटभर जेवण. शहरात अशा दोनशे अम्मा कँटीन आहेत. लोक स्वस्तात चवदार जेवणाचा आस्वाद घेतात.

मूळचे के रळी सुरेंद्रन ऑटो रिक्षा चालवण्याचे काम करतात. रोजची कमाई दोन ते अडीचशे रुपये. दररोज अम्मा कँटीनमध्ये दुपारचे जेवण. लांबच लांब रांग असते. थोडा वेळ जातो; परंतु आठ रुपयांत मिळणारे चवदार जेवण त्यांना आकर्षित करते. मुख्यमंत्री जयललिता यांनी फेब्रुवारीत इथे 50 कँटीन सुरू केल्या. लोकप्रिय होताच एकाच महिन्यात 200 वॉर्डांमध्ये सुरू कराव्या लागल्या. अल्पस्वल्प कमाई करणाºया लोकांना स्वस्तात जेवण देण्याचा हेतू यामागे होता; पण इथे केवळ चालक, सुरक्षा रक्षक, हेल्पर, मजूर येतात असे नाही, तर चांगले खात्यापित्या घरातील लोकही कार बाजूला पार्क करून जेवण, नाष्टा करतात. कॉमर्समध्ये शिक्षण घेणारा के. राघवन म्हणाला, हॉटेलमध्ये हीच इडली दहा रुपयांत, तर फुटपाथवरील ठेल्यांवर पाच रुपयांत मिळते. आणि अशा जेवणासाठी किमान 30 रुपये लागतात. त्यामुळेच आठवड्यातील तीन उर्वरित ते चार दिवस तो अम्मांच्या कँटीनमध्येच नाष्टा, जेवण करतो. अर्थात यामुळे परिसरातील हॉटेलच्या व्यवसायांवर परिणाम झाला आहे.

अम्मा कँटीनचे नेटवर्क महानगरपालिकेच्या हाती आहे. जयललिता यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेची जबाबदारी 1988 च्या बॅचचे आयएएस अधिकारी विक्रम कपूर यांच्यावर टाकली आहे. ते महानगरपालिकेचे आयुक्त आहेत. आयआयएम बंगळुरूमध्ये एमबीए करणारे अरोरा म्हणतात, चेन्नईत दारिद्र्यरेषेखाली नागरिकांची लोकसंख्या 20 टक्के म्हणजे सहा लाख आहे. त्यापैकी दीड लाख लोकांना दररोज जेवण दिले जाते. प्रत्येक व्यक्तीला ही सोय उपलब्ध करून देण्यासाठी किमान 1 हजार कँटीन सुरू करण्याची योजना आहे. पुढील महिन्यात आढावा घेतल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल.
सध्या एका इडलीसाठी एक रुपया 86 पैसे खर्च येतो. प्रत्येक दिवशी सुमारे 14 लाख रुपये खर्च व उत्पन्न नऊ लाख रुपये मिळते. उर्वरित पैसे सबसिडीच्या रूपात सरकारकडून मिळतात. योजनेला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी एका तासात तीन हजार इडल्या तयार होतील अशा मशीन्स ठेवण्यात येणार आहेत. कपूर म्हणतात, त्या वेळी एका इडलीचा खर्च एकच रुपया होईल. पाच रुपयांत पौष्टिक भोजन शक्य आहे, हे आम्ही सिद्ध क रू. ग्राहकांना अम्मांकडून आणखी एक खुशखबर म्हणजे सप्टेंबरपासून भातासोबतच पोळीही मेनुकार्डमध्ये असेल. सध्या तरी चेन्नईव्यतिरिक्त तिरुचिरापल्ली, मदुराई, वेल्लोर, कोइम्बतूर, सालेम, तिरुनावेल्ली, त्रिपोर, तुतिकोरिन आणि इरोड या नऊ शहरांमध्ये ही योजना सुरू आहे.

बिहारमधील विषारी मध्यान्ह भोजनाची पुनरावृत्ती येथे शक्य वाटत नाही. महापालिका तांदूळ, मसाले, गॅस आणि ताज्या भाज्यांचा पुरवठा प्रत्येक केंद्रावर करतात. महिलांना साफसफाई आणि स्वयंपाक करण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले आहे. काउंटरवर देण्यापूर्वी त्याची तपासणी आवश्यक आहे. सीएचओ डॉ. जी. टी. थंगराजन म्हणतात, प्रत्येक केंद्राची जबाबदारी एका सॅनिटरी निरीक्षकावर आहे. गुणवत्ता राखण्यासाठी भांडी गरम पाण्याने धुतली जातात. पिण्याच्या पाण्यासाठी आरओ फिल्टर सिस्टिम लावण्यात आली आहे. हॉटेलातही सर्वसाधारणपणे एवढी काळजी घेतली जात नाही.

० आता प्रत्येक कँटीनमध्ये स्वत:चे किचन आहे. सप्टेंबरपासून 15 विभागांत सेंट्रलाइज्ड किचन बनवण्यात येईल. त्याच महिन्यापासून भातासोबतच पोळीचाही मेनुकार्डमध्ये समावेश होईल.

० या वर्षअखेरीस केवळ चेन्नई शहरात 1000 अम्मा कँ टीन असतील.

० मुख्यमंत्री जयललितांचे विशेष आदेश. भोजनाच्या गुणवत्तेबद्दल तक्रारी नकोत. आयुक्तांकडून नियमित माहिती मागितली जाते. कमी वेळात योजना लोकप्रिय झाल्यामुळे नऊ शहरांमध्येही विस्तार.

० प्रत्येक कँ टीनमध्ये तक्रारी अथवा सूचनेसाठी बॉक्स. वेळ सकाळी सात ते दहा आणि दुपारी बारा ते तीन आहे; परंतु बहुसंख्य लोकांनी दिवसभर कँ टीन सुरू ठेवा, अशी मागणी केली आहे.

2400 महिला, दरमहा 9 हजार रुपये कमाई
सन 2011 मध्ये जयललिता तिसºयांदा मुख्यमंत्री झाल्या. प्रत्येक वेळी महिला हाच त्यांचा फोकस आहे. पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या त्या वेळी प्रत्येक जिल्ह्यात महिलांचे पोलिस ठाणे उभारण्यात आले. दुसºया वेळेस महिला पोलिस दलाची वेगळी तुकडी करण्यात आली. आता या योजनेद्वारे महिलांच्या स्वयंसहायता गटातील 2400 महिलांची निवड करण्यात आली.

एका महिन्याचा हिशेब
14 लाख रुपये दररोज खर्च
09 लाख रुपये उत्पन्न
05 लाखांची सरकारी सबसिडी
1.5 लाख दररोजचे ग्राहक

पाच महिन्यांची विक्री
3.5 कोटी इडल्या
60 लाख सांबार-भात प्लेट
42 लाख दहीभात प्लेट
200 वॉर्डांमध्ये कँटीन

पहाटे साडेचारपासूनच कामाला सुरुवात
2400 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. 28 वर्षीय पी. लता त्यांपैकीच एक. त्या प्रथम चायनीज सेंटरमध्ये कु क होत्या. दरमहा पाच हजार वेतन. अम्मा कँटीनमध्ये प्रत्येकाला दरमहा 9 हजार वेतन मिळते. उमा, मैथिलीचीही तीच कहाणी. उमा टेलरिंग, तर मैथिलीस महिला जिममध्ये चार-पाच हजार वेतन मिळत होते. कँटीनमध्ये दररोज सात तास काम करून त्यांना दुपटीने वेतन मिळत आहे. त्या सकाळी साडेचार वाजता घरातून निघतात. नाष्टा तयार करण्यासाठी त्यांना केवळ दोन तासांचा वेळ मिळतो. भोजनाची जबाबदारी दुसºया टीमवर आहे. त्या नऊ वाजता येतात.