आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यात होली क्रॉसची मोडतोड सुरुच, तपास सीबीआयकडे सोपवण्‍याची काँग्रेसची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोवा - पोलिस बंदोबस्त वाढवून देखील दक्षिण गोव्यात सुरु असलेले क्रॉसच्या मोडतोडीचे प्रकार थांबलेले नाहीत. बुधवारी रात्री मडगाव पासून 8 किमी अंतरावर असलेल्या लोटली गावातील क्रॉसची मोडतोड़ करून समाजकंटकांनी पोलिस आणि सरकारला आव्हान दिले आहे. आतापर्यंत दक्षिण गोव्यात विविध ठिकाणी 9 होली क्रॉसची मोडतोड करण्‍यात आली आहे.  

समाजकंटकांना शोधण्‍यात पोलिसांना अपयश येत असल्याने धार्मिक प्रतिमांच्या मोडतोडीचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या घटनेस जबाबदार असलेल्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देत दिसताक्षणी गोळ्या झाडायला हव्यात असे मत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे. चर्च संस्‍था आणि राज्यपालांनी नागरिकांना धार्मिक सलोखा जपण्याचे आवाहन केले आहे.
बातम्या आणखी आहेत...