आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोगाच्या पंजाब गन हाऊसमधून खरेदी केलेल्या शस्त्रास्त्राने फोडला नाभा तुरुंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पतियाळा/ नाभा - मोगाच्या पंजाब गन हाऊसच्या मालकाने नाभा तुरूंग फोडण्यासाठी आरोपींना शस्त्रास्त्रे पुरविली होती. ज्यांना तुरुंगासंबंधी माहिती होती त्यांची तुरुंग फोडण्यासाठी विक्की गौंडर आणि गुरप्रीत सेखो यांनी मदतही घेतली होती. यानंतर सातत्याने मुलाखतीचा बहाणा त्यांनी तुरुंगाची रेकी तुरुंग फोडण्यासाठी केली होती. 

अटकेतील आरोपींत गुरप्रीतसिंग सेखो, मनप्रीतसिंग सेखो, कुलविंदरसिंग ऊर्फ टिंबरी, निवासी भटिंडा, राजविंदरसिंग ऊर्फ सुलतान ऊर्फ राजू निवासी मांगेवाल यांनी पोलिस कोठडी पहिल्याच दिवशी पोलिसांना लेखी दिले. एसपी-डी एचएस विर्क म्हणाले, नाभा तुरुंग फोडण्यासाठी सेटअप लावला नव्हता. हे पोलिसांना चकवण्यासाठी आरोपींनी सांगितले होते. आता पंजाब गन हाऊसच्या मालकाला या प्रकरणात अटकेची कारवाई सुरू आहे. गन हाऊसच्या मालकाने यांना पिस्टल व गनसारखी चार मोठी शस्त्रास्त्रे जास्तीच्या किमतीत दिली होती. वापरातील सर्व शस्त्रास्त्रे जप्त केली. गुरप्रीत सेखोंकडून मिळालेली शस्त्रास्त्रे वेगळीच आहेत. 

या शस्त्रास्त्रांची मोगाच्या पंजाब गन हाऊसव्यतिरिक्त कुठून खरेदी केली गेली याचीही चौकशी सुरू आहे. नाभा तुरुंग फोडण्यादरम्यान गेटवर नियुक्त संत्रीची एसएलआर (सेल्फ लोडिंग रायफल) ला सुलतानने हिसकावून घेतले होते. या रायफलला हिसकावल्यानंतर पुन्हा तुरुंगाच्या जवळच फेकून दिले होते.   
 
विमानतळावरील बेपर्वाईने रोमी पळाला
नाभामध्ये २७ चिनी व डेबिट कार्डासह पकडलेल्या रोमीने तुरुंगातच या लोकांबरोबर हातमिळवणी केली आणि तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतरही या लोकांशी बोलत राहिला. तुरुंगाधिकाऱ्यांची बेपर्वाई व मिलीभगतच्या कारणाने आरोपी गँगस्टर आतमध्ये मोबाइल फोन वापरून रोमीच्या संपर्कात राहिले. जामिनावर बाहेर आल्यावर रोमी हाँगकाँगला पलून गेला. फरार झाला. तथापि त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड पोलिसांनी विमानतळ अधिकाऱ्यांना पाठविले होते. विमानतळ प्राधिकरणाची बेपर्वाईच यास कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. एसपीडी विर्क यांनी म्हटले की, अलर्ट पाठविले होते. 
  
बातम्या आणखी आहेत...