आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BRICS : दहशतवादाची जन्मभूमी तर आमच्या शेजारी, मोदींचे पाकला खडे बोल, चीनलाही टोले!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - भारत-रशिया-चीनसह पाच प्रमुख राष्ट्रांची संघटना असलेल्या ‘ब्रिक्स’ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नाव न घेता पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या शेजारी देशातच दहशतवाद्यांची जन्मभूमी असल्याचे सांगून दहशतवादाला आश्रय देणारेही दहशतवाद्यांपेक्षा कमी नाहीत, असे मोदी म्हणाले. याच वेळी चीनलाही त्यांनी टोला लगावला. दहशतवादविरोधी लढ्यात दुहेरी भूमिका घातक असल्याचे ते म्हणाले.
परिषदेच्या समारोप समारंभात बाेलताना मोदी यांनी ब्रिक्सच्या सदस्य राष्ट्रांनी दहशतवादाविरुद्ध एकत्रित लढा द्यावा, असे आवाहन केले. मोदी म्हणाले, ‘दहशतवाद्यांची जन्मभूमी आमच्या शेजारीच आहे. त्यांचेच दहशतवादी जगभर पसरले आहेत. राजकीय लाभासाठी दहशवादाला पोसण्याची या देशाची मानसिकता आहे. म्हणूनच संपूर्ण जगाला शांतता व सुरक्षितता तसेच विकासाच्या दृष्टीने हा धोका अाहे. हा धोका टाळण्यासाठी सर्वांनी मिळून जागतिक पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत.’

आज मध्य-पूर्वेत, पश्चिम आशिया, युरोप आणि दक्षिण आशियात दहशतवादाचा मोठा धोका आहे. या भागांतील लोकांच्या सुरक्षिततेलाच धोका निर्माण झाला आहे. याचा परिणाम आज आर्थिक विकासावर होत आहे. यावर ब्रिक्स राष्ट्रांनी जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे. दहशतवाद्यांना पुरवला जाणारा पैसा, त्यांना दिले जाणारे प्रशिक्षण, राजकीय पाठबळ बंद करावे लागेल. या वेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती जेकब जुमा आणि ब्राझीलचे नेते मायकेल टेमर उपस्थित होते.

दहशतवादविरोधी कारवाईवर एकमत
ब्रिक्स राष्ट्रांनी या परिषदेत दहशतवादाविरुद्ध आपसांत जोरदार एकजूट दाखवली. शिवाय या वाढत्या कारवांविरुद्ध निर्णायक कारवाई करण्यावरही त्यांचे एकमत झाले. या परिषदेच्या गोवा जाहीरनाम्यात म्हटले आहे की, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना मिळणाऱ्या पैशाचा स्रोत शोधून काढण्याबरोबरच त्यांना शस्त्रास्त्रे आणि प्रशिक्षण देणाऱ्यांनाही लक्ष्य करणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादाबाबत भारताने संयुक्त राष्ट्रसंघात मांडलेला प्रस्ताव मंजूर करण्याबाबतही सदस्य देशांनी इतर देशांना आवाहन केले.

चार वर्षांत दुप्पट व्यापार : ब्रिक्स राष्ट्रांनी येत्या
चार वर्षांत आपसांतील व्यापार दुप्पट करून ५०० अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य ठेवावे, असा सल्ला मोदी यांनी दिला. सन २०२० पर्यंत हा व्यापार ५०० अब्ज डॉलरवर जावा, अशी अपेक्षाही मोदी यांनी व्यक्त केली.
पुढे वाचा, रशियासोबत झालेला सर्वात मोठा करार....
बातम्या आणखी आहेत...