आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bride Absconding With Family After Marriage At Phajilka In Punjab

पाहायला गेले, नवरी घेऊन आले; दहाच दिवसांत नवरीही गेली दागिनेही गेले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजयकुमार आणि सुमन. - Divya Marathi
अजयकुमार आणि सुमन.
फाजिल्का/जालंधर (पंजाब) - तो पहिल्‍यांदाच आईवडिलांसोबत मुलगी पाहायला गेला. सजून धजून मुलगी आली नि 'ती पाहताच बाला कलेजा खल्‍लास झाला,' या प्रमाणेच त्‍याची अवस्‍था झाली. मनात गुदगुल्‍या झाल्‍या. लागलीच होकार दिला. मुलगा खूष तर आपणही खूष म्‍हणत आईवडिलांनीही पसंती दर्शवली. घाई घाईत लग्‍नही उरकले. पण, लग्‍नाच्‍या दहाच दिवसांनंतर नवरीने नवऱ्याला गुंगीचे औषध देऊन रात्रीतून पळ काढला. ही घटना पंजाबमधील फाजिल्का येथे घडली. अजय कुमार असे मुलाचे तर सुमन असे मुलीचे नाव आहे.
मुलीच्‍या आईने म्‍हटले, मुलगी सुंदर होती
मुलगी सुंदर होती म्‍हणून आम्‍ही तिला सून म्‍हणून घरी आणले होते. परंतु, नवरीच्‍या नव्‍याचे नऊ दिवस संपले आणि तिने पळ काढला, अशी प्रतिक्रिया मुलाच्‍या आईने दिली. दरम्‍यान, आम्‍ही मुलीच्‍या मोहरी जावून शोध घेण्‍याचा प्रयत्‍न केला असता केवळ तिच नाही तर तिच्‍या आईवडिलांनीही पळ काढल्‍याचे समजले. शिवाय हे कुटुंब त्‍या गावत फक्‍त 15 दिवसांपूर्वी राहायला आले होते. त्‍यांना त्‍या ठिकाणी कुणीही ओळखत नव्‍हते, अशी माहिती ग्रामस्‍थांनी दिल्‍याचे मुलीच्‍या आईने सांगितले.
अंगावर होते दागिने...
अजयकुमार याच्‍या कुटुंबीयांनी मुलीकडून एक रुपयाही घेतला नव्‍हता. उलट मुलीच्‍या अंगावर 1 तोळा सोन्‍याचे दागिने घातले. शिवाय लग्‍नावर दीड लाख खर्च केला.
कसा काढला पळ
लग्‍नानंतर मांडव परतणीसाठी अजय स्‍वत: सुमनला घेऊन तिच्‍या माहेरी आला होता. यावेळी सुमनचे आईवडील आणि भावाने त्‍याचे खूप आदरतिथ्‍य केले. मात्र, शुक्रवारी रात्री सुमनने अजयला दिलेल्‍या पेय पदार्थात गुंगीचे औषध टाकले. त्‍यामुळे अजय बेशुद्ध झाला. सकाळी त्‍याला जाग आली तर घरात कुणीच नव्‍हते. सामानही गायब होते. त्‍यानंतर आपली फसवणूक झाल्‍याचे त्‍याच्‍या लक्षात आले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...