आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bride And Groom Reached By Helicopter For Marriage

विवाहासाठी हेलिकॉप्टरने पोहोचले नवरदेव नवरी, बघ्यांनी केली गर्दी, पाहा PHOTO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - प्रथमच एखाद्या विवाहासाठी नवरदेव आणि नवरी यांचे आगमन हेलिकॉप्टरमधून झाले. नवरदेव अंकित जैन याचे वडिल किशोर कुमार मुंबईत सराफा व्यापारी आहेत. नवरदेव आणि नवरी असलेले हेलिकॉप्टर दुपारी बाराच्या सुमारास कुंदेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर उतरले. त्याठिकाणाहून नवरदेव आणि नवरी विवाहास्थळी पोहोचले आणि विधी संपन्न झाले.

दुपारी एकच्या सुमारास कुंदेश्वर मंदिराजवळ जैन बागेत तयार करण्यात आलेल्या मंडपात त्यांचा विवाद झाला. लग्नाचे शुटिंगही ड्रोनद्वारेच करण्यात आले. लग्नात गौतम पी.जैन, ललित मेहता, ताराचंद दुग्गा, सुरेश गुलेच्छा, अभय श्रीश्रीमाळ, पारस जैन, जसवंत मुणोत, नेमीचंद कटारिया उपस्थित होते.
जोधपूरमध्ये रिसेप्शन
नवरदेवाचे वडील किशोर कुमार आणि नवरी सरैया जैनचे वडील कमलेश जैन तखतगढ येथील रहिवासी आहेत. विवाहानंतर नातेवाईकांचा आशीर्वाद घेऊन पावणे चारच्या सुमारास नवविवाहित दाम्पत्य पुन्हा हेलिकॉप्टरद्वारे जोधपूरकडे रवाना झाले. जोधपूर येथील पॅलेस भवनमध्ये रिसेप्शन झाले.
अविस्मरणीय सोहळा ठरावा म्हणून
नवरदेवाचे वडील किशोर कुमार यांनी सांगितले की, विवाहसोहळा अविस्मरणीय राहावा यासाठी हे सर्व करण्यात आले. ते म्हणाले की, गावात विवाह समारंभ आयोजित करण्याचे कारण म्हणजे काही तरी, नवीन कराचे हे होते, असे त्यांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर पाहा PHOTO