आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरदेवाप्रमाणे सजली नवरी, आई वडिलांनी घोडीवर बसवून काढली मिरवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - बीजेएसच्या रहिवासी असलेल्या राजकुमारी राणा. आपल्या दोन्ही भावांच्या निधनानंतर त्या संपूर्ण कुटुंबासाठी आधार बनल्या. एका मुलाप्रमाणे जबाबदारी सांभाळत तिने आपल्या आई वडिलांसह वहिणी आणि पुतण्यांचाही सांभाळ केला. शनिवारी राजकुमारीचा विवाह होता. पण विवाहाच्या एक दिवसाआधी तिच्या आई वडिलांनी मुलाप्रमाणे आपल्या मुलीची वरात काढायची ठरवली. विवाहाच्या आधल्या दिवशी मुलाला मिरवण्याच्या या प्रथेला राजस्थानाच 'बांदोली' असे म्हणतात. त्यासाठी तिला अगदी नवरदेवाप्रमाणए सजवण्यात आले. शेरवानी परिधान करून, कमरेवर तलवार बांधून घोड्यावरून तिली बांदोली निघाली.
फोटो - नवरदेवाप्रमाणे सजून घोड्यावर बसलेली राजकुमारी.

जालोरच्या रामा गावातील रहिवासी राजकुमारी हिते वडील पेमाराम यांनी सांगितले की, त्यांच्या दोन मुलांच्या निधनानंतर राजकुमारीने एखाद्या मुलाप्रमाणेच संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळली होती. चार मुलींमध्ये सर्वात लहान असणारी राजकुमारी पदवीधर आहे. तिने घरात ब्युटीपार्लर सुरू केले आहे. दिवस रात्र परीश्रम करत तिने कुटुंबीयांचा सांभाळ केला आहे. त्यासाठी एखाद्या राजकुमाराप्रमाणे आमच्या राजकुमारीचा विवाह करण्याचा निर्णय आम्ही घेतला असे पेपारा म्हणाले.

पुढील स्लाइडवर पाहा, राजकुमारीच्या विवाहाचा PHOTO