बलिया - विवाहादरम्यान नवरदेवाला नोटा मोजता आल्या नाही म्हणून नवरीने नकार देत अक्षरशः लग्नच मोडले. ही घटना उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील बांसडीह परिसरातील आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बांसडीह परिसरातील मॅरीटार गावात एक विवाह सोहळा होता. राजकुमार बिन्द यांच्या मुलीच्या विवाहासाठी बक्सर जिल्ह्यातील छोटका राजपूर गावातून व-हाड आले होते. विवाहमंडपात नवरदेव मनोजच्या काही हालचालींवरून नवरीला तो अशिक्षित असल्याची शंका झाली. त्यावेळी नवरीने त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याला मोजण्यासाठी काही पैसे दिले. त्यावेळी नोटाही नीट मोजता आल्या नाही, म्हणून नवरीने लग्नाला नकार दिला.
सर्व विधी झाले होते, केवळ सप्तपदी राहिली होती
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिहारच्या बक्सर जिल्ह्यातून व-हाड ठरलेल्या वेळेवर बलिया येथे पोहोचले. द्वारपूजा आणि वरमाल असे विधी उरकल्यानंतर केवळ सप्तपदीच बाकी होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार नवरीने तिच्या एका मैत्रिणीमार्फत नवरदेवाला मोजण्यासाठी काही नोटा दिल्या. पण त्याला त्या नोटा मोजला आल्या नाहीत. बराच वेळ वाद झाल्यानंतर पंचायत बोलवावी लागली. त्यानंतर झालेल्या निर्णयाने लग्न न होताच व-हाड परतले.
आधीही घडली आहे अशी घटना
मध्य प्रदेशच्या विदिशामध्ये एका नवरदेवाने शिविगाळ केल्यामुळे नवरीने लग्नाला नकार दिल्याचे प्रकरण समोर आले होते. यावेळी नवरीने लग्नासाठी संपूर्ण तयारी केली होती. नवरदेवही मित्रांबरोबर गप्पा मारण्यात मग्न होता. पण तो शब्दा शब्दाला शिव्या देत होता. तो प्रकार नवरीच्या लक्षात आला. त्यावेळी जो इतरांच्या आई, बहिणींचा आदर करत नाही तो माझा आदर करा करणार असा विचार करत तिने लगेचच निर्णय घेतला आणि लग्नाला नकार दिला. तिच्या आई वडिलांनीही या निर्णयाला दुजोरा दिला.