आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांडवातच वधूने घेतली वराची गणिताची परीक्षा, नापास झाल्यावर मोडले लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मैनपुरी - लग्न मंडपात जेव्हा नवरदेवाला व्यवस्थित मंत्रोच्चार जमले नाही तेव्हा नवरीने गणितातील काही सोपे प्रश्न त्याला विचारले. त्याचेही उत्तर देता आले नाही तेव्हा नवरीने मंडपातच त्याच्यासोबत लग्नाला नकार दिला. वधुपित्यानेही मान्य केले की मुलीसाठी योग्य वर शोधला नव्हता.

काय आहे प्रकरण
- मैनपुरीच्या गुलरियापूर गावातील खुशबू नावाच्या मुलीचा ओमवीर सोबत विवाह निश्चित झाला होता.
- सोमवारी विवाह विधी सुरु झाल्यानंतर पुरोहिताने मंत्रपठण सुरु केले आणि त्यांच्या पाठोपाठ वर ओमवीर आणि वधु खुशबू यांना मंत्रोच्चार करण्यास सांगितले. तेव्हा ओमवीरला एकही मंत्र बरोबर म्हणता येत नव्हता. हे त्याच्याच एका मित्राने खुशबूला सांगितले.
- त्यानंतर खुशबूने ओमवीरला गणिताचे काही प्रश्न विचारण्याचा निर्धार केला.

मंडपात सुरु झाली गणिताची परीक्षा
- खुशबूने ओमविरला काही नाणी मोजण्यास सांगितली. मात्र त्याला नऊच्या पुढे मोजता आले नाही.
- वर ओमवीरला खुशबूचा मोबाइल नंबरही व्यवस्थित डायल करता आला नाही.
- एवढेच नाही तर, 69 आणि 79 यातील फरकही त्याला सांगता आला नाही.

... मग खुशबूने घेतला निर्णय
त्यानंतर खुशबूने वर ओमवीर हा मेंटली अनफिट असल्याचे सांगत त्याच्यासोबत लग्न करु शकत नसल्याचे जाहीर केले. कुटुंबियांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. हे प्रकरण नंतर जात पंचायतीत गेले मात्र त्यांचा निर्णय एकण्यास आणि आपला निर्णय फिरवण्यास तिने नकार दिला.

कुटुंबाने मान्य केली चूक
खुशबूच्या निर्णयाने तिच्या गावातील लोक आनंदी आहेत. तिच्या वडिलांनी मुलीची माफी मागत म्हटले, की आम्ही मुलीसाठी योग्य वर शोधला नव्हता. ते म्हणाले, 'मध्यस्थाने ओमवीरची आणि आमची कधीही भेट घडविली नव्हती.' दुसरीकडे ओमवीरने बुधवारी दुसऱ्या मुलीसोबत विवाह केला.

वऱ्हाडी काय म्हणाले
लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांनी सांगितले, की खुशबू 8 वीपर्यंत शिकलेली आहे आणि तिला शिक्षिका होण्याची इच्छा आहे. त्यांचे म्हणणे आहे की ओमवीर अशिक्षित आणि मेंटली अनफिट आहे.