आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहाच्या मंडपात नववधुचा मृत्यु, सजलेल्या डोलीत पार्थिव घेऊन परतला नवरदेव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बख्तियारपूर (बिहार)- मंडपात सनई चौघड्याची धूण गुंजत होती. नवर्‍या मुलाने धुमधडाक्यात मंडपात प्रवेश केला. मंगलाष्टके झाली. नववधुने वरच्या तर वराने नववधुच्या गळ्यात मंगलमाळ टाकली. सप्तपदी सुरु होताच काही कळण्याच्या आत नवरी मुलगी कोसळली. तिला क्लिनिकमध्ये हलवले परंतु, काही एक उपयोग झाला नाही. नवर्‍या मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित करताच विवाहस्थळी स्मशान शांतता पसरली. अन् सजलेल्या डोलीत पत्नीचे पार्थिव घेऊन नेण्याची वेळ बिहारमधील एका नवर्‍या मुलावर आली.ही घटना वाकया पाटणापासून 60 किलोमीटरवरील बख्तियारपूर येथे घडली.

मृत नवरी मुलगी सोनी कुमारी ही रवींद्र सिंह यांची एकुलती एक मुलगी होती. तिचा विवाह विंदा राय यांचे चिरंजिव गयानंद कुमार याच्यासोबत रविवारी झाला. परंतु, दोघांनी एकत्र येणे हे परमेश्वराला मान्य नसावे.

सप्तपदी सुरु असताना नवरी मुलीच्या अंगात अचानक थंडी भरली. ती स्टेजवरच कोसळली. तिला तत्काळ क्लिनिकमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला तपासले व मृत घोषित केले. सनई बंद झाली. सर्वत्र स्मशान शांतता पसरली. ज्या घरातून सोनीकुमारीची डोली उठणार होती, त्या घरातून तिची अर्थी उचलण्यात आली.

गयानंद कुमारच्या इच्छेनुसार सोनीचे पार्थिव सजलेल्या डोलीतून नेण्यात आले. गंगा घाटवर गयानंदने सोनीच्या पार्थिवाला मुखाग्नि दिला.

पुढील स्लाइडवर पाहा, गयानंद कुमार व सोनी कुमारीचे फोटोज...