आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरीच्या परिक्षेसाठी तीन तास आधीच उरकली सप्तपदी, पेपरनंतर झाली बिदाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेपर सोडवताना संगिता. - Divya Marathi
पेपर सोडवताना संगिता.
कोटा - राजस्थानच्या मेहर समाजात पूर्वी मुलींच्या शिक्षणाबाबत आई वडिल फारसे सजग किंवा गंभीर नसायचे. सोमवारी मात्र मुलीच्या शिक्षणाबाबत याच समाजातील एका कुटुंबाने आदर्श घालून दिला. मेहर समाज विकास समितिच्या वतीने दसरा मैदानात झालेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात जेडीबीची विद्यार्थिनी असलेल्या संगिताच्या विवाहानंतर सप्तपदीचा विधी तीन तास आधीच दुपारी एक वाजता उरकण्यात आला. त्यानंतर बिदाईच्या आधी नवरी पोहोचली ते थेट परिक्षेच्या हॉलमध्ये पेपर सोडवायला.

तर सायंकाळी चार वाजता याठिकाणी 37 जोडप्यांचा सामुहिक विवाह होणार होता. पण संगिताचा सोमवारी एमए प्रिव्हियस हिन्दी विषयाचा अखेरचा पेपर होता. समितीचे अध्यक्ष सुरेश मेहरा यांना नातेवाईकांनी माहिती दिली त्यावेळी त्यांनी तीन तास आधीच सर्व व्यवस्था करून त्यांचे फेरे उरकले. जेडीबी कॉलेज च्या प्रो. लीला मोदी यांनी सांगितले की, संगिताने सामाजिक और शैक्षणिक दोन्ही बाजुंची सांगड घालत मुलींच्या शिक्षणाच्या महत्त्वाचा एक चांगला संदेश दिला आहे.
पुढील स्लाइड्सवर वाहा नवरीचे इतर PHOTO
फोटो- जितेंद्र जोशी