आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 4 दिवसांनी नवरदेवाचा मृत्यू, नवरी म्हणाली-मला दुधामध्ये रोज गुंगीचे औषध पाजत होते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विष प्राशनाने नवरदेवाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. - Divya Marathi
विष प्राशनाने नवरदेवाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शामली - येथे लग्नाच्या 4 दिवसांनीच नवरदेवाचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. मृत नवरदेवाच्या सासरच्या मंडळींनी त्याचे भावजयीशी अवैध संबंध असल्याचा आरोप केला आहे. सोबत मृताच्या कुटुंबीयांवर खुनाचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे.   

 

लग्नानंतर कळले पतीचे सत्य, माहेरी पोहोचल्यावर आली ती बातमी...
- ही घटना शामली जिल्ह्याच्या भवन परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या बहादूर यांचे लग्न 4 दिवसांपूर्वी शहरातील प्रियंकाशी झाले होते.
- प्रियंका म्हणाली, लग्नानंतर सासरी आल्यावर मला सर्वांचे वागणे विचित्र दिसत होते. मला रोज झोपण्याआधी दुधात झोपेची गोळी मिसळून दिली जात होती.
- एका दिवशी असेच मला दूध देण्यात आले. ते प्यायल्यानंतर मी झोपी गेले. रात्री अचानक आवाजाने माझी झोप चाळवली. पाहिले तर पती बहादूर आपल्या भावजयीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत होता. मी याबद्दल ना कुणाला काही बोलले, ना भांडण केले. कारण मी सुन्न झाले होते. मला मोठा धक्का बसला होता.
- दुसऱ्या दिवशी मी माहेरी आले. येथे आल्यावर काही वेळानेच मला कळले की, बहादूरचा मृत्यू झाला आहे. परत आल्यावर पाहिले तर पतीचा मृतदेह बेडरूममध्ये पडलेला होता, त्यांच्या तोंडातून फेस बाहेर येत होता.
- मला पूर्ण विश्वास आहे की, त्यांच्या भावजयीनेच त्यांना विष पाजून त्यांची हत्या केली आहे.
- भवन पोलिस स्टेशनचे एसओ राजकुमार म्हणाले, मृत बहादूरच्या सासरच्या मंडळींनी दिलेल्या तक्रारीवरून भावजयीविरुद्ध केस दाखल करण्यात आली आहे. डेडबॉडीला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आली आहे, रिपोर्ट आल्यासनंतरच क्लीअर होईल की, या व्यक्तीने स्वत: विष प्यायले अथवा त्याला पाजण्यात आले.
- पतीच्या मृत्यूनंतर प्रियंका धक्क्यातून सावरलेली नाही. तब्येत बिघडल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिला शुद्ध आल्यावर याप्रकरणी तसेच अवैध संबंधांबाबत आणखी माहिती मिळू शकेल असे ते म्हणाले.


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...