आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मधुचंद्राच्या रात्री पतीची वाट पाहत राहिली नवरी, सकाळ होताच दिसले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणाचे 23 नोव्हेंबर रोजी लग्न झाले होते. - Divya Marathi
तरुणाचे 23 नोव्हेंबर रोजी लग्न झाले होते.

कोडरमा (झारखंड) - मरकच्चो परिसरात शनिवारी सकाळी विहिरीत एका नवरदेवाचा मृतदेह आढळला. तरुणाचे 23 नोव्हेंबरलाच लग्न झाले होते. शुक्रवारी मधुचंद्राची तयारी करण्यात आली होती, परंतु नवरी नवरदेवाची वाटच पाहत राहिली. शनिवारी त्यांचे रिसेप्शन होणार होते. परंतु नवरदेवाचा मृतदेह आढळल्याने परिसरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

 

पैशांचा वाद किंवा प्रेमप्रकरणाचा घेतला जातोय संशय...
- पोलिस सूत्रांनुसार, सोनेडीह येथील गव्हर्नमेंट टीचर जितेंद्र बर्णवालचे गुरुवारी लग्न झाले होते. लोक म्हणाले की, त्याला हुंड्यात मोठी रक्कम मिळाली होती. यामुळे याच पैशांवरून कुटुंबीयांशी वाद होऊन जितेंद्रने आत्महत्या केली असेल.
- दुसरीकडे, त्याचे एखाद्या तरुणीशी अफेअरही घटनेला जोडून पाहिले जात आहे. खुनाचीही शंका व्यक्त करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना लोकांनी डॉग स्कॉडची मागणी करून मृतदेह बराच वेळ काढू दिला नव्हता.

 

शुक्रवारी नवरीला घेऊन गावी आला होता जितेंद्र 
- वास्तविक, जितेंद्रचे 23 नोव्हेंबरला धुमधडाक्यात लग्न झाले. शुक्रवारी नवरीसह तो आपल्या घरी आला होता. शुक्रवारी संध्याकाळी गावातील लोकांना मेजवानी देण्यात आली होती.
- दुसरीकडे, मधुचंद्राचीही तयारी सुरू होती. परंतु शुक्रवार संध्याकाळपासूनच जितेंद्र घरातून गायब झाला. कुटुंबीयांनी त्याचा खूप शोध घेतला, पण आढळला नाही.
- सकाळी एका महिला घराजवळच्या विहिरीकडे गेली तेव्हा तिथे एका पॉलिथिन बॅगमध्ये जितेंद्रची घडी आणि जॅकेट आढळले. महिलेने लगेच कुटुंबीयांना माहिती दिली.
- सगळे विहिरीकडे गेले आणि गळ टाकला असता मृतदेह त्यात अडकला. घटनास्थळी पोहोचलेले पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत होते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज....

बातम्या आणखी आहेत...